शरीराच्या नसा मजबूत ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचे नियमित करा सेवन
सर्वच स्वयंपाक घरात मसाल्यांचा वापर केला जातो. भारतातील मसाले जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. मसाल्यांचा सुंगध, चव पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे जेवणाचे पदार्थ बनवताना या मसाल्यांचा वापर केला जातो. हळद, दालचिनी, काळीमिरी, आलं, लसूण, जिरे, तमालपत्र इत्यादी अनेक वेगवेगळे मसाले जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी वापरले जातात. या मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडेंट, दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्याला अनेक फायदे होतात. या मसाल्यांच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीरातील हाडे, रक्तवाहिन्या, नसा, पचनशक्ती इत्यादी अनेक गोष्टी सुधारण्यासाठी होतो.(फोटो सौजन्य – iStock)
भारतीय मसाल्यांचा वापर आयुर्वेदामध्ये सुद्धा करण्यात आला आहे. या मसाल्यांच्या वापरामुळे अनेक गंभीर आजार, जुनाट आजार बरे झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन वापरामध्ये भारतीय मसाल्याना विशेष महत्व आहे. मज्जातंतू कमकुवतपणा, आळस, रक्ताभिसरण समस्या आणि इतर गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही या मसाल्यांचा वापर करू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मज्जासंस्था आणि शरीराच्या नसा मजबूत ठेवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या मसाल्यांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सर्दी, खोकला किंवा पचनक्रिया बिघडल्यानंतर काळीमिरीची पावडर मधात मिक्स करून चाटण तयार केले जाते. यामुळे खोकला कमी होऊन आरोग्य सुधारते. याशिवाय शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी काळीमीरीचे सेवन करू शकता. काळीमिरीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते. यामध्ये पाइपरिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे मेंदूची शक्ती वाढते. काळीमीरीचे सेवन केल्यामुळे मेंदूचे कार्य सक्षम होते.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. आल्याच्या पाण्याचे सेवन उपाशी पोटी केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली विषारी घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. आल्याच्या सेवनामुळे शरीराला, हाडांना आलेली सूज किंवा वेदना कमी होतात. याशिवाय शरीराचे रक्तभिसरण सुधरण्यास मदत होते. दैनंदिन आहारात आल्याचे सेवन नियमित करावे.
डाळ किंवा मसाल्यातील पदार्थाना फोडणी देण्यासाठी लसूणचा वापर केला जातो. लसूण खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लसूण खाल्यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते. तसेच शरीरातील शिरांमध्ये तयार झालेले अडथळे कमी होतात. मज्जासंस्था आणि शरीरातील नसांचे कार्य सुधारण्यासाठी लसूणचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लसूण खाल्यास कोलेस्ट्रॉल कमी होऊन रक्तवाहिन्या स्वच्छ होतील. तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो.