
भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
भुवयांवर असलेल्या दाट आणि काळ्याभोर केसांमुळे त्वचेच्या सौंदर्यात भर पडते. काहींच्या भुवयांवर खूप कमी केस असतात तर काहींच्या भुवयांवर खूप घनदाट केस आणि व्यवस्थित शेप असतो. भुवयांचे डोळ्यांचे धूळ, घाम आणि कचऱ्यापासून रक्षण करतात. याशिवाय चेहऱ्यावरील भूमिका आणि हावभाव व्यक्त करण्याची उत्तम पद्धत म्हणजे भुवया उंचावून बोलणे. पण काहीवेळा शरीरात होणाऱ्या बदलांमुळे भुवयांवरील केस गळू लागतात आणि भुवया पातळ दिसू लागतात. भुवयांचे केस वेगाने गळणे, ठिकठिकाणी चट्टे पडणे किंवा घनता कमी होणे ही लक्षणे शरीरसंबंधित अंतर्गत आजारांमुळे दिसू लागतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला भुवयांवरील केस पातळ होण्याची कारणे? भुवयांवरील केस काळेभोर होण्यासाठी कोणते उपाय करावेत? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
भुवयांवरील केस पातळ होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. वारंवार थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा प्लकिंग केल्यामुळे केसांची मूळ खराब होतात. ज्याच्या परिणामामुळे भुवयांवरील केस पातळ होऊन जातात. याशिवाय शरीरातील लोह, विटामिन D, विटामिन B12, झिंक, बायोटिन आणि प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यास केस गळण्यास सुरुवात होते. थायरॉईडची लागण झाल्यानंतर अनेक बदल होतात. गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीदरम्यान केसांच्या समस्या वाढू लागतात.याशिवाय वाढत्या मानसिक तणावामुळे सुद्धा ॲलोपेशिया अरेटा सारख्या आजारांची लागण होऊ शकते.
भुवयांवरील विरळ झालेले केस घनदाट करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करावा. एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक ॲसिड, विटामिन ई आणि फॉलिक ॲसिड इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यासाठी रात्री झोपण्याआधी कापसाच्या मदतीने एरंडेल तेल भुवयांवर लावावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा एरंडेल तेल भुवयांवर लावल्यास केसांची वाढ होण्यास मदत होईल.
उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
भुवयांची घनता सुधारण्यासाठी कोरफड जेल सुद्धा फायदेशीर ठरते. संपूर्ण चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते. कांद्याच्या रसात सल्फर युक्त घटक असतात. केसांच्या वाढीसाठी कांदा प्रभावी ठरतो. कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिक्स करून लावल्यास केस मजबूत होण्यासोबतच चमकदार सुद्धा दिसतील. ऑलिव्ह ऑईलमध्ये विटामिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते आणि भुवयांवर पडलेले चट्टे कमी होतात.
Ans: हार्मोन्समधील बदल, पोषणाची कमतरता, ताणतणाव, त्वचेच्या काही समस्या, वारंवार भुवया प्लक करणे किंवा इतर कारणांमुळे भुवयांचे केस विरळ होऊ शकतात.
Ans: काही नैसर्गिक घटक भुवयांच्या केसांना मॉइश्चर आणि पोषण देण्यास मदत करू शकतात. मात्र त्यांचा वापर केल्याने भुवयांचे केस हमखास किंवा वेगाने वाढतात, असे ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत.
Ans: संतुलित आहार घ्यावा, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात मिळतील याची काळजी घ्यावी. भुवया वारंवार प्लक करणे टाळावे आणि त्वचेची योग्य काळजी घ्यावी.