जसे जसे आपले वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकुत्या (Wrincles) येतात व आपली त्वचा निस्तेज (dull) बनत जाते. जसे आपण सनस्क्रीन लोशन न लावता उन्हात जातो तसे अल्ट्राव्हायोलेट किरणे (UV Rays) आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवतात, त्वचा डॕमेज करतात. जसे बाहेर फिरताना आपली त्वचा प्रदूषित हवेच्या संपर्कात येते तसे वातावरणातील घाण (Dirt) आपल्या त्वचेच्या छीद्रांमध्ये अडकते. शिवाय बाह्य वातावरणातून विषाणूसंसर्ग (Bacterial Infection) किंवा बुरशी संसर्ग (Fungal Infection) होऊही त्वचाविकार जडतात.
म्हणजे थोडक्यात जसे जसे आपण बाहेर फिरताना प्रदूषित बाह्य वातावरणाच्या संपर्कात येतो तसे तसे बाह्य वातावरणातील घाण (Dirt) आपल्या त्वचेच्या छीद्रांमध्ये अडकते, उन्हात अल्ट्राव्हायोलेट किरणे (UV Rays) त्वचा डॕमेज करतात. तसेच बाह्य वातावरणातून विषाणूसंसर्ग (Bacterial Infection) किंवा बुरशी संसर्ग (Fungal Infection) होऊनही त्वचाविकार होऊ शकतात.
हार्मोन्सच्या असंतुलनाची प्रमुख कारण म्हणजे, चुकीचे खानपान, चुकीची जीवनशैली, ताण-तनाव व शरीराच साचून राहिलेली विषारी द्रव्ये जी प्रदूषित अन्न-हवा-पाणी या माध्यमातून शरीरात जातात व आपल्या काही चूकीच्या सवयींमुळे तयारही होतात. चूकीच्या सवयी म्हणजे रात्री उशीरा झोपणे, पाणी कमी पिणे, जेवतांना किंवा जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिणे, विरुद्ध आहार इत्यादी.
यासाठी खर्चिक व केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर न करता 100% हर्बल अशा, स्वस्त आणि मस्त अशा वॉटर थेरपी (Water Therapy) ची ट्रीटमेंट घेणे उत्तम. यासाठी कसलेही केमिकल न वापरता फक्त तीन वेगवेगळ्या PH च्या पाण्याचा वापर केला जातो
संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. बोटाने गोलाकार पद्धतीने हळुवारपणे घासावे. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून चेहरा कोरडा करावा. हे चेहऱ्याच्या त्वचेवरील छीद्रांमधील घाण व तेलकट द्रव्ये काढून त्वचेची छीद्रे स्वच्छ करते. संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. त्यानंतर थोडा वेळ थांबून स्वच्छ कपड्याने पुसून चेहरा कोरडा करावा. यामुळे चेहऱ्यावरील विषाणू संसर्ग (Bacterial Infection) व बुरशी (Fungal Infection) नष्ट करते. संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. हे फेस टोनर असल्यामुळे पुसायचे नाही, चेहऱ्यावर वाळू देणे. यामुळे चेहरा टवटवीत (फ्रेश) दिसतो.






