
वृद्धापकाळ आनंदात घालवणे आणखीनच होईल सोपे! दैनंदिन जीवनात फॉलो करा 'या' सवयी
आयुष्यभर नोकरी आणि पैसा यामागे धावपळ केल्यानंतर एक वेळ अशी येते की, तुम्हाला थांबावेच लागते. तूमचे शरीर तूम्हाला थांबायला भाग पाडते. त्याला आयुष्याची उतरंडी असेही म्हणतात. या काळात सर्वात जास्त गरज नातवंडांची आणि आपल्या जवळच्या माणसांची असते. पण, प्रत्येकाच्याच वाट्याला ते सुखं येत असे नाही. अनेक घरं खूप मोठी असतात पण त्यात राहणारी माणसे केवळ दोनच. तीही वृद्ध कोणाचाही आधार नसलेली. तूमचंही वय झालंय, पहिल्यासारखी कामे होत नाहीत. तर आजपासूनच काही बदल तूमच्या जीवनशैलीत करून घ्या. जेणेकरून तुम्हाला एकट्याने कोणाचीही मदत न घेता वृद्धापकाळ व्यतीत करणे सोपे जाईल.(फोटो सौजन्य – istock)
आयुष्यभर तूम्ही कधीही व्यायाम केला नसेल. तर आता व्यायामासाठी बाहेर पडण्याची वेळ आली आहे असे समजा. कारण, उतरत्या वयात शरीर तंदुरूस्त रहावे यासाठी शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे. गुढघेदुखी, पाय दुखी यामूळे चालणे टाळले जाते. नियमित व्यायाम करा.
वय उतरतीला लागलं की नियमीत डॉक्टरांची अपॉईंटमेन्ट घ्या, रूटीन चेकअप करा. डॉक्टर, सिस्टर यांच्याशी सतत कॉन्टॅक्टमध्ये रहा. अगदीच इमरजन्सी असेल तेव्हा ओळखीच्या लोकांचे नंबर फेव्हरेट लिस्टमध्ये ठेवा.
वय वाढल्याचा परिणाम जसा शरीरावर होतो तसा तो मनावरही होती. गोष्टी विसरणे, चिडचिड होणे या गोष्टी सुरू होतात. त्यामूळे मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या. आनंदी रहा, स्वतःला एकटे समजून विचारात मग्न होऊ नका.
उतरत्या वयात सोबत कोणी नसेल तर उरलेल आयुष्य जगणं कठीण होईल. त्यामुळेच मित्र बनवा. मित्रांसोबत चहा, नाश्ता केलात तर दोन घास जास्त जातील. त्यांच्यासोबतच्या गप्पा तुमचं आयुष्य सुखकर बनवतील.
आपलं काळजी घेणारं कोणीतरी हवं, ज्याच्याशी आपण मैत्रीपूर्ण वातावरणात आयुष्य व्यतीत करू, असे वाटत असेल तर तूमची काळजी घेण्यासाठी शक्य असल्यास केअर टेकर ठेवा. जेणेकरून ते तूमची चांगली काळजी घेतील.तूम्हाला जेवण आणि औषधे वेळेवर देतील.
बाहेर पडायला शरीर साथ देत नसेल तर काही ऑनलाईल क्लास जॉईन करा. फेसबुक, ट्विटरवर ब्लॉग लिहा. तूमचे अनुभन इतरांना शेअर करा. ज्यामूळे तुमचा बराच कंटाळा निघून जाईल.