Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुषांमधील Sperm Count होतोय कमी, जीवनशैलीतील बदलांचा शुक्राणूंच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम

Sperm Count: सध्या पुरुषांमध्ये वंध्यत्व ही समस्या वाढीला लागलेली दिसून येत आहे आणि यावर अनेक उपायही केले जातात. मात्र नक्की हा त्रास हा होतोय आणि स्पर्म काऊंट का कमी होतोय जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 23, 2024 | 05:05 PM
पुरुषांमध्ये शुक्राणूंचा दर्जा खालावतोय, काय आहे कारण

पुरुषांमध्ये शुक्राणूंचा दर्जा खालावतोय, काय आहे कारण

Follow Us
Close
Follow Us:

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 25-40 वयोगटातील पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होत चालली आहे. यास कारणीभूत घटकांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव, जीवनशैलीतील बदल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, पर्यावरणातील प्रदूषक आणि व्यसन तसेच पर्यावरणातील विषारी घटकांचा समावेश आहे. 

संतुलित आहाराचे सेवन, रोज व्यायाम करणे, योगासने व ध्यानधारणा करून तणावमुक्त राहणे आणि अवैध औषध आणि स्टेरॉईडचा गैरवापर टाळणे ही काळाची गरज आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

शुक्राणूंची संख्या कमी का होते?

स्पर्म काऊंट कमी का होतोय

ज्याप्रमाणे स्त्रियांमध्ये स्त्रीबीजाचे प्रमाण कमी होते, त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये देखील शुक्राणूंची संख्या कमी होते. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे बदलती जीवनशैली. 

शुक्राणूंची संख्या कमी असणे (ओलिगोझूस्पर्मिया) आणि वीर्यमध्ये शुक्राणू नसणे (अझोस्पर्मिया) हे गर्भधारणेच्या शक्यतेवर परिणाम करतात. चूकीच्या आहाराच्या सवयी आणि  व्यायामामध्ये व्यस्त न राहणे याचा परिणाम पुरुष प्रजनन प्रणालीवरही होतो. फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स लठ्ठपणास कारणीभूत ठरु शकतात आणि त्यात हानिकारक रसायनांचा समावेश असू शकतो जी शुक्राणूंच्या कमी उत्पादनाशी संबंधित आहेत. 

Sperm च्या गुणवत्तेवर परिणाम

पर्यावरणीय प्रदूषक आणि विषारी पदार्थ, phthalates आणि bisphenol-A (BPA) सारखी रसायने संप्रेरक पातळीमध्ये व्यत्यय आणतात आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. तणावामुळे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढते आणि टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. पुरुषांनी प्रजनन सल्लागाराचा संपर्कात राहावे असे सल्ला डॉ. सुलभा अरोरा, क्लिनिकल डायरेक्टर, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी,मुंबई यांनी स्पष्ट केले.

पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा

पुरुषांना करावा लागतोय वंध्यत्वाचा सामना

वंधत्वाचा सामना करण्याची कारणे

डॉ. अंकिता कौशल, प्रजनन सल्लागार आणि आयव्हीएफ तज्ज्ञ, मदरहुड फर्टिलिटी अँड आयव्हीएफ, खारघर, नवी मुंबई सांगतात की, सध्या केवळ महिलांनाच प्रजनन-संबंधित समस्या येत नाहीत तर पुरुषांनाही याचा सामना करावा लागत आहे. 25 ते 40 वयोगटातील पुरुषांमधील शुक्राणूंच्या संख्येत घट होत आहे यास कारणीभूत घटकांमध्ये पर्यावरणीय प्रदूषण, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, दीर्घकाळ बसणे आणि तणाव यांचा समावेश आहे. 

पुरुषांनी निरोगी आहार, नियमित व्यायाम, ध्यानासारख्या तणाव व्यवस्थापन तंत्रांचे पालन करणे आणि रसायनांचा संपर्क कमी करणे आवश्यक आहे. निरोगी वजन राखणे, अल्कोहोल आणि तंबाखूचे सेवन कमी करणे देखील शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारण्यास मदत करू शकते. दर्जेदार उपचार पर्यायांसाठी, प्रजनन तज्ज्ञांना भेट द्या जे तुम्हाला ठराविक तपासण्या करण्यास सांगतील.

यासाठी काय खावे

पुरूषांनी आहारात काय खावे

डॉ. सुलभा अरोरा पुढे सांगतात की, शुक्राणुंचे आरोग्य सुधारण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स, निरोगी फॅट्सचा समावेश असलेला  पौष्टिक आहार निवडावा. हिरव्या पालेभाज्या, तृणधान्य, कडधान्ये, मसूर, सोयाबीन, अंडी, केळी, अक्रोड, टोमॅटो, आणि भोपळ्याच्या बिया खा, रोज व्यायाम करा, योगासने आणि ध्यानधारणा करून तणावमुक्त रहा, तंबाखू, धूम्रपान आणि मादक पदार्थांचे सेवन टाळा. 20 ते 25 च्या पातळीत योग्य BMI व वजन नियंत्रित राखा.  शुक्राणूंची संख्या आणि वीर्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी दररोज किमान 8-9 तास झोप घ्या. लक्षात ठेवा, पुरुषांनी स्त्रियांप्रमाणेच त्यांच्या लैंगिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

100 च्या वेगाने फर्टिलिटी वाढवतील 5 पदार्थ, पुरूषांसाठी ठरतील वरदान

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Sperm count in men is decreasing lifestyle changes have a negative impact on sperm health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 05:05 PM

Topics:  

  • Health News
  • male infertility

संबंधित बातम्या

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी
1

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.