
सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिन तसेच प्रवासासाठी परफेक्ट आहे 'व्हेज कोल्ड सँडविच'; जाणून घ्या रेसिपी
आजच्या धावपळीच्या जीवनात पटकन तयार होणारे आणि आरोग्यदायी असे काहीतरी खाण्याचा पर्याय शोधत असाल, तर व्हेज कोल्ड सॅंडविच हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. हा सॅंडविच बनवण्यासाठी गॅसची गरज नसते आणि तो कुठेही सहज घेऊन जाता येतो. ऑफिस, पिकनिक, शाळेचा डबा किंवा प्रवासात. ताज्या भाज्यांचा वापर, चवदार मेयोनेझ किंवा हिरवी चटणी आणि थंडगार सर्व्ह केल्यामुळे याला “कोल्ड सॅंडविच” असे नाव मिळाले आहे. विशेष म्हणजे, हा पदार्थ पौष्टिक आणि हलका असल्याने तो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो.
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत पनीर बटाट्याचे कबाब, लहान मुलांसह मोठ्यांना आवडेल पदार्थ
तुम्ही अनेकदा खाण्यापिण्याच्या स्टाॅल्सवर हा पदार्थ पाहिला असेल किंवा चाखला असेल पण हा कोल्ड सँडविच घरी कसा तयार करायचा याची एक सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. ही रेसिपी फार झटपट तयार होते आणि चवीलाही फार छान लागते. हेच कारण आहे की तुमच्या लिस्टमध्ये ही रेसिपी आवर्जून असायला हवी. चला तर मग जाणून घेऊया हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
चविष्ट अन् पौष्टिक; सकाळच्या नाश्त्याला बनवा हिरव्या मूगडाळीचा चिला
कृती: