
वाढत्या थंडीत कायमच राहाल फिट आणि मजबूत! दैनंदिन जीवनातील 'या' सवयींमध्ये करा बदल
थंडीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
थंड वातावरणात आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स?
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंड वातावरणात अनेक लोक बाहेर फिरणे टाळतात. कारण वाढत्या थंडीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. थंडीमुळे शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. बाहेरील पदार्थांचे कमीत कमी सेवन करून पौष्टीक आणि संतुलित आहार घ्यावा. यामुळे वजन सुद्धा नियंत्रणात राहील आणि शरीराला कोणत्याही आजाराची लागण होणार नाही. (फोटो सौजन्य – istock)
हिवाळा सुरु होताच त्याचा आपली त्या शरीर आणि शारीरिक प्रक्रियांवर जाणवायला लागतो.हिवाळ्यात भूक वाढते आणि शारीरिक कष्ट काहीअंशी कमी होतात, मात्र लहान-सहान गोष्टींसोबत सकाळची सुरुवात केली तर हिवाळ्यात आपण सृदृढ तर राहणारच शिवाय आपल्या सौंदर्यातदेखील भर पडेल. आजच्या सदरात आपण हिवाळ्यात फिट राहण्यासाठी काय काळजी घ्याल याबाबत जाणून घेऊयात.
अंथरुणावरुन उठल्यानंतर आपल्या शरीरास ताण द्या आणि नंतर ढिले सोडा. पुन्हा ताणा आणि ढिले सोडा. चार ते पाच वेळा ही क्रिया करा. असे केल्याने शरीराचे तापमान वाढेल. जर आपल्याकडे वेळ असेल तर एका ठिकाणी उभे राहून, काही वेळ जॉगिंग करा. असे केल्याने शरीरात स्फूर्ती येईल आणि आपले पुढची कामे लवकर होतील.
जर आपले कार्यालय आपल्या घरापासून जास्त लांब नसेल तर कार्यालयापर्यंत पायी जा. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया वाढेल, ज्यामुळे आपणास थंडी जास्त जाणवणार नाही. या ऋतूत लिफ्टचा प्रयोग कमी करा. दिवसातून दोन ते तीनदा पाय यांचा वापर करा. यामुळे शरीराचा व्यायाम तर होईल शिवाय शरीरास ऊजदिखील मिळेल.
या ऋतूत पायाच्या टाचा आणि ओठांना तडे पडतात. यासाठी पायांची मालिश करुन थंडीपासून बचाव करावा. घरात स्लीपरसोबतच मोजे परिधान करा. तसेच ओठांवर व्हॅसलीन व लिपस्टिक लावत रहा, यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत.घराचे तापमान संतुलित ठेवा. जास्त उष्ण किंवा जास्त वातानुकूलित रुममध्ये झोपू नये.
हिवाळ्यात भूक अधिक लागते आणि रिकाम्या पोटी थंडी जास्त वाजते. यासाठी सकाळी पौष्टिक नास्ता भरपूर खा. तसेच जेवणात भरपूर ऊर्जा प्रदान करणारे खाद्यपदार्थ घ्या. गरमागरम सूप घेणेदेखील या ऋतूत आरोग्यासाठी फायदेशीर असते. याशिवाय हंगामी फळांचे नियमित सेवन करावे. फळांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात स्मूदी किंवा ताज्या फळांचे सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहील.
ऋतुमानानुसार कपड्यांची निवड करा. त्यात जाड व जड कपड्यांऐवजी बारीक पण गरम कपडे घ्या. यामुळे आपला नक्कीच थंडीपासून बचाव होईल. तसेच इनरवेअर कॉटनचे असतील तर उत्तमच. दस्ताने आणि मोजे परिधान करण्यात संकोच नको. यामुळे आपणास आराम तर मिळेलच शिवाय त्वचेचेही संरक्षण
होईल.
Ans: नाकाचा आणि घशाचा (वरच्या श्वसनमार्गाचा) एक विषाणूजन्य संसर्ग आहे. हा प्रामुख्याने ऱ्हायनोव्हायरस (Rhinovirus) कुटुंबातील विषाणूंमुळे होतो.
Ans: नाक वाहणे किंवा बंद होणे, घसा खवखवणे किंवा दुखणे, खोकला शिंका येणे
Ans: बहुतेक लोक 7 ते 10 दिवसांत सामान्य सर्दीतून बरे होतात. काही लक्षणे, जसे की नाक वाहणे आणि खोकला, कधीकधी 14 दिवस किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतात.