Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटात साचलेल्या अ‍ॅसिडमुळे अन्ननलिकेत जळजळ होते? मग नियमित खा ‘हे’ पदार्थ, तात्काळ मिळेल आराम

रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावे, ज्यामुळे आरोग्याला कोणतीही हानी पोहचणार नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 19, 2025 | 10:57 AM
पोटात साचलेल्या अ‍ॅसिडमुळे अन्ननलिकेत जळजळ होते? मग नियमित खा 'हे' पदार्थ

पोटात साचलेल्या अ‍ॅसिडमुळे अन्ननलिकेत जळजळ होते? मग नियमित खा 'हे' पदार्थ

Follow Us
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात वाढलेल्या ऍसिडमुळे पोटात जळजळ होणे, उलट्या, मळमळ किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. याशिवाय आपल्यातील अनेकांना अ‍ॅसिड रिफ्लक्स ही समस्या उद्भवते. पोटात जमा झालेले ऍसिड अन्ननलिकेत म्हणजेच एसोफेगसमध्ये जमा होऊ लागते. हे ऍसिड जमा झाल्यानंतर वारंवार आंबट ढेकर येणे, सतत पित्त वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

‘हे’ पदार्थ घशातून खाली जाताच किडनीमध्ये तयार करतात मुतखडा, चुकूनही आहारात करू नका सेवन

शरीरात विषारी पदार्थ तसेच साचून राहिल्यामुळे सत्ता अपचनाची समस्या उद्भवू लागते. शरीरात वाढलेला ऍसिड छातीपर्यंत पोहचल्यानंतर अन्न किंवा पाणी पुन्हा तोंडात येणे, सतत खोकला येणे, आवाजात कर्कशपणा किंवा घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे जळजळ कमी होईल आणि तात्काळ आराम मिळेल.

ओटमील:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी काहींना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण सतत चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त वाढते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते. त्यामुळे नाश्त्यात तुम्ही ओट्स आणि फळांचे सेवन केले जाते. ओट्समध्ये भरपूर फायबर असते. यामुळे शरीरात अ‍ॅसिडिटी वाढत नाही. छातीमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नाश्त्यात ओट्सचे सेवन करावे.

आलं आणि दही:

दही आल्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. दह्यात असलेले प्रोबायोटिक्स शरीरात वाढलेली जळजळ कमी करतात. यासाठी वाटीभर दह्यात थोडस आलं किसून सेवन केल्यास छातीमध्ये वाढलेली जळजळ कमी होईल आणि आराम मिळेल. आल्यामध्ये असलेले गुणधर्म दाहक विरोधी गुणधर्म पोटाला आराम देतात.

दातांवर चिटकून राहिलेली काळी कीड क्षणार्धात पडेल बाहेर! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, दात होतील मुळांपासून स्वच्छ

हिरव्या पालेभाज्या:

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीर सुधारते. रोजच्या आहारात इतर कोणत्याही भाज्यांचे सेवन करण्याऐवजी पालेभाज्यांचे सेवन करावे. आहारात पालक, ब्रोकोली, काकडी, बीन्स इत्यादी हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील आणि पोटासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Stomach acid causing inflammation of the esophagus then eat this food regularly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • acidity
  • home remedies

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
4

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.