दातांवर चिटकून राहिलेली काळी कीड क्षणार्धात पडेल बाहेर! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर
रोजच्या आहारात सतत गोड किंवा चिकट पदार्थ खाल्यामुळे दात खराब होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय काहींना सतत तंबाखू किंवा गुटखा खाण्याची सवय असते. पण हे पदार्थ आरोग्यासाठी विषा सामान आहेत. सुंदर दिसण्यासाठी जशी चेहऱ्याची काळ्सजी घेतली जाते तशीच काळजी दातांची सुद्धा घेतली जाते. दाताने अन्नपदार्थ खाल्ले जातात, चावणे इत्यादी अनेक क्रिया दात करतात. वाढत्या वयात दातांसंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे दातांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. दात खराब झाल्यानंतर बऱ्याचदा दातांना कीड लागणे, दात खराब होणे, दातांच्या हिरड्या सुजणे, दात आतून खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
दातांना कीड लागल्यानंतर दातांचे आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. सतत चिकट किंवा गोड पदार्थ खाल्यामुळे दातांवर कीड लागणे आणि दातांवर पिवळा थर जमा होण्यास सुरुवात होते. दातांना कीड लागल्यानंतर अतिशय तीव्र वेदना होऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांना लागलेली कीड कायमची नष्ट करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबदल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे दातांना लागलेली कीड नष्ट होईल आणि दात स्वच्छ राहतील.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुरटीचा वापर आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. दातांमध्ये लागलेली कीड नष्ट करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात मीठ मिक्स करा. तयार केलेले मिश्रण दातांवरील कीड लागलेल्या भागात लावा आणि काहीवेळ तसेच ठेवा. याशिवाय तुरटी दातांवर लावल्यानंतर हलक्या हाताने दात घासावे. काही मिनिटांमध्येच दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होऊन आराम मिळेल.
जेवण बनवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. याशिवाय हे तेल आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. मोहरीचे तेल आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत दातांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर केला जात आहे. मोहरीच्या तेलात हळद आणि मीठ मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण दातांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे दातांवर लागलेली कीड नष्ट होईल आणि दात स्वच्छ होतील.
जेवणात फोडणी देताना हिंगाचा वापर केला जातो. हिंगाच्या वासामुळे पदार्थ लवकर खराब सुद्धा होत नाही. हिंग पदार्थाची चव वाढण्यासोबतच शरीरासाठी सुद्धा महत्वाचे ठरते. टोपात पाणी गरम करून त्यात हिंग टाका आणि पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. उकळले पाणी थंड झाल्यानंतर गुळण्या करा. यामुळे दात स्वच्छ होतात.