'हे' पदार्थ घशातून खाली जाताच किडनीमध्ये तयार करतात मुतखडा
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी संपूर्ण शरीर स्वच्छ करण्याचे काम करते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी किडनी महत्वाचे कार्य करते. शरीराचे शुद्धीकरण, पाणी-साखर-खनिज इत्यादींचे संतुलन राखणे अशी अनेक कामे किडनी करते. पण हल्लीच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येत आहे.आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, बिघडलेले मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. शरीराच्या चुकीच्या सवयींनमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
किडनी स्टोन म्हणजे कॅल्शियम ऑक्सालेट, यूरिक अॅसिड किंवा इतर खनिजांपासून शरीरात खड्डे तयार होण्यास सुरुवात होते. हे खड्डे झाल्यानंतर पोटात असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक पेनकिलरच्या गोळ्या खातात. मात्र या गोळ्यांच्या सेवनामुळे किडनी निकामी होण्याची जास्त शकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन होण्यास कोणते पदार्थ कारणीभूत ठरतात आणि आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास किडनी स्टोनची समस्या कमी होईल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
किडनीमध्ये मुतखडा होण्याची काही सामान्य कारणे आहेत. शरीरात ऑक्सालेट नावाचं नैसर्गिक रसायन अन्नपदार्थांमधून शरीराला मिळतो. जो घटक कॅल्शियमशी संबंधित आहे. शेंगदाणे, पालक, चॉकलेट, बीट, रताळी इत्यादी पदार्थांच्या सेवनामुळे मुतखडा होण्याची जास्त शक्यता आहे. रोजच्या आहारात या पदार्थांचे सतत सेवन केल्यास शरीरात मुतखडा वाढून पोटाला त्रास होतो. याशिवाय पोटात वाढलेला मुतखडा मूत्रमार्गात अडकण्याची जास्त शक्यता असते.
शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अनेकांना असेच वाटते शरीरातील कॅल्शियम कमी केल्यानंतर मुतखड्याचा धोका कमी होतो, पण असे नसून यामुळे मुतखडा होण्याची जास्त शक्यता असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरात मुतखडा वाढतो. त्यामुळे आहारात ऑक्सालेटयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये तुम्ही दूध, दही, चीज यांसारखी कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थ खाऊ शकता.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी शरीराला पाण्याची भरपूर आवश्यकता असते. पण बऱ्याचदा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे दिवसभरातून नियमित ३ लिटर पाणी प्यावे. पण प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यावे.