Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत पोट फुगणे, गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास? तुमच्या रोजच्या ‘या’ सवयी ठरू शकतात घातक

Gas Acidity Causes: पोटात वारंवार गॅस होणे, पोट फुगणे आणि जडपणा जाणवणे यामागे केवळ अन्नपदार्थच नव्हे, तर रोजच्या चुकीच्या सवयीही कारणीभूत असू शकतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 30, 2026 | 07:47 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • पोट फुगणे, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास?
  • ‘या’ सवयी असू शकतात कारण
  • वारंवार गॅस का होतो?
पोटात गॅस होणे, पोट फुगणे, ढेकर येणे किंवा जडपणा जाणवणे ही आजकाल अनेकांची सामान्य तक्रार बनली आहे. अनेकांना असे वाटते की यामागे एखादा विशिष्ट पदार्थ कारणीभूत आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते रोजच्या लाइफस्टाइलमधील काही चुकीच्या सवयीही पचनसंस्थेवर परिणाम करून गॅसची समस्या वाढवू शकतात. वेळेवर जेवण न करणे, घाईघाईने खाणे आणि सतत जंक फूड खाणे यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.

महागडी क्रीम नको! तांदळाच्या पाण्यापासून घरच्या घरी बनवा नाईट क्रीम; चेहरा दिसेल तजेलदार

वारंवार गॅस का होतो?

पचन प्रक्रियेदरम्यान आतड्यांमध्ये नैसर्गिकरित्या गॅस तयार होतो. मात्र, जेव्हा पचन नीट होत नाही किंवा आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडते, तेव्हा गॅस, पोट फुगणे आणि अस्वस्थता वाढू शकते. काही प्रकरणांमध्ये तणाव, बद्धकोष्ठता किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) यांसारख्या समस्या देखील कारणीभूत असू शकतात.

वेळेवर जेवण न करणे

जेवणामध्ये खूप मोठे अंतर ठेवल्यास पचनक्रिया प्रभावित होऊ शकते आणि गॅसची समस्या वाढू शकते. त्यामुळे दररोज शक्यतो ठरावीक वेळी जेवण्याची सवय लावा.

घाईघाईने जेवणे

अन्न नीट न चावता पटकन खाल्ल्यास जास्त हवा पोटात जाते. त्यामुळे गॅस, ढेकर आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.

तेलकट- प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे अतिसेवन

फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ, जास्त मसालेदार आणि तळलेले पदार्थ काही लोकांमध्ये पचनावर ताण आणून गॅस वाढवू शकतात.

दिवसभर एकाच जागी बसून राहणे

शारीरिक हालचाल कमी असल्यास पचनक्रिया मंदावू शकते. यासाटी नियमित चालणे किंवा हलका व्यायाम केल्याने पचन सुधारण्यास मदत होते.

गॅसचा त्रास कमी करण्यासाठी काय करावे?

  • भरपूर पाणी प्या.
  • अन्न सावकाश आणि नीट चावून खा.
  • रोज किमान ३० ते ४० मिनिटे व्यायाम करा किंवा
  • जंक फूड आणि कार्बोनेटेड पेये मर्यादित प्रमाणात प्या.
  • तणाव कमी करण्यासाठी योगा किंवा ध्यान करा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर वारंवार गॅससोबत तीव्र पोटदुखी, सतत पोट फुगणे, वजन कमी होणे, उलट्या, भूक न लागणे किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल दिसत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे इतर पचनविकारांचे संकेत असू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Motion Sickness: प्रवासात मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय

Web Title: Stomach gas causes bloating acidity lifestyle digestive health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • acidity
  • health care news
  • stomach

संबंधित बातम्या

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस
1

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
2

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.