पोटात सारखा गुडगुडण्याचा आवाज येतो? जाणून घ्या पोटातून आवाज येण्याची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय
Stomach Rumble: जेवल्यानंतर बऱ्याचदा अपचन होऊन खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होऊन मळमळ, आंबट ढेकर येतात. तर काहीवेळा पोटातून गुडगुड किंवा गुरगुरल्यासारखे वाटते. पोटातून येणाऱ्या आवाजामुळे लाजिरवण्यासारखे वाटू लागते. पचनसंस्थेत अन्न, पाणी आणि वायू पुढे सरकत असताना आतड्यांच्या हालचालींमुळे पोटातून गुडगुडल्यासारखा आवाज येतो. या समस्येला वैद्यकीय भाषेत बॉर्बोरिग्मी असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे वारंवार पोटातून गुडगुडण्याचा आवाज येत असेल किंवा अपचनाच्या समस्या उद्भवत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पोटातून सतत गुडगुडल्याचा आवाज का येतो, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
Women health: महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या का वाढतेय? जाणून घ्या कारणे आणि वेळीच करा हे उपाय
बऱ्याचदा पोटात अन्नपदार्थ नसल्यामुळे किंवा काहीच न खाल्ल्यामुळे पोटातून गुडगुडण्याचा आवज येऊ लागतो. भूक लागल्यावर पचनसंस्थेच्या हालचाली सुरू होतात, ज्याच्या परिणामामुळे पोटातून आवाज येतो. पोट आणि आतड्यांमध्ये वायू व द्रव पदार्थांची हालचाल झाल्यामुळे प्रामुख्याने आवाज येण्याची शक्यता असते. त्यामुळे भूक लागल्यानंतर लगेच काहींना काही खाणे आवश्यक आहे.
अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर ते पचनसंस्थेवाटे हळूहळू खाली सरकत जाते. आतड्यांच्या आकुंचन-प्रसरणाच्या हालचालींमुळे अन्न, पाणी आणि वायू याची सतत हालचाल होत असते. त्यामुळे जेवणानंतर पोटातून आवाज येणे अतिशय सामान्य आहे. अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटातील वायूचे प्रमाण वाढते आणि खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. डाळी, कडधान्ये, कोबी, फ्लॉवर, कांदा आणि काही दुग्धजन्य पदार्थांमुळे काहींना गॅस होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटातून ढेकर येणे, आवाज येणे किंवा आंबट पाणी तोंडात आल्यासारखे वाटते.
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठता झाल्यानंतर आहारात बदल करणे सुद्धा आवश्यक आहे. नियमित भरपूर पाणी आणि फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास आतड्यांमधील मल बाहेर पडून जातो. बद्धकोष्ठता झाल्यानंतर काहीवेळा पोट फुगणे, गॅस होणे आणि पोटातून आवाज येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
Lifestyle tips: सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावावी? जाणून घ्या ७ सोप्या टिप्स
वारंवार अपचनाच्या समस्या उद्भवत असतील तर जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. आहारात फायबर आणि पाणीदार पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमधील मल बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. वारंवार पोटातून आवाज येत असेल तर जेवणाच्या नियमित वेळा, अन्न सावकाश चावून खा, पुरेसे पाणी प्या इत्यादी सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
Ans: होय. आतड्यांमध्ये गॅस जमा झाल्यामुळे पोटात गुडगुडण्याचा आवाज, पोट फुगणे आणि अस्वस्थता जाणवू शकते.
Ans: काही वेळा अपचन, अन्न असहिष्णुता, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) किंवा आतड्यांच्या संसर्गामुळे पोटातून आवाज येऊ शकतो.
Ans: पोटातून आवाज येण्यासोबत तीव्र पोटदुखी, उलट्या, ताप, सतत जुलाब, पोट खूप फुगणे किंवा शौचास अडथळा येत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.






