Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार नखं चावून खात असाल तर थांबा! आरोग्यासंबंधित उद्भवतील ‘हे’ गंभीर आजार, वाईट सवयींपासून राहा लांब

शरीरात मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर अनेक लोक नखं चावतात. पण नखं चावून खाणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2025 | 01:56 PM
वारंवार नखं चावून खात असाल तर थांबा! आरोग्यासंबंधित उद्भवतील 'हे' गंभीर आजार

वारंवार नखं चावून खात असाल तर थांबा! आरोग्यासंबंधित उद्भवतील 'हे' गंभीर आजार

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कायम नखं चावण्याची सवय असते. नकळतपणे नखे चावून खाल्ली जातात. तर काही लोक नखांसोबत नखांच्या आजूबाजूला असलेली स्किनसुद्धा चावतात. यामुळे इन्फेक्शन किंवा आरोग्यासंबंधित आजारांचा धोका वाढतो. काहींना लहानपणापासूनच नखं चावण्याची सवय असते. तर काही तणाव, काळजी किंवा अस्वस्थ झाल्यानंतर नख चावून खातात. वारंवार नखं चावून खाल्ल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. डॉक्टरांच्या मते, नखे चावून खाण्याची सवय बऱ्याचदा चिंता विकार, आत्मविश्वासाचा अभाव किंवा ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डरच्या लक्षणांमुळे उद्भवते. नेहमीच नख चावून खाल्यामुळे तोंडातील बॅक्टरीया वाढतात. आज आम्ही तुम्हाला नखं चावून खाल्यामुळे कोणते आजार होण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

महिलांच्या शरीरात Vitamin B12 कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ लक्षणे, दुर्लक्ष न करता घ्या वेळीच उपचार

मानसिक आरोग्यावर परिणाम:

मानसिक संतुलन बिघडल्यानंतर बऱ्याचदा नखं चावून खाल्ली जातात. नखे चावून खाणे हे चिंता, नैराश्य किंवा तणावासंबंधित आजारांची लक्षणे आहेत. लहान मुलांमध्ये नख चावून खाण्याचे प्रमाण अधिक आहे. मनातील आत्मविश्वास कमी झाल्यानंतर अनेक लोक नख चावून खातात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे.

‘या’ आजारांचा धोका वाढतो:

सतत नख चावून खाल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचा धोका वाढतो. नख चावल्यानंतर नखांमध्ये असलेली घाण थेट शरीराच्या आतमध्ये जाते, ज्यामुळे पोटाच्या समस्या किंवा इतर आजारांची लागण होण्याची भीती असते.नखांमुळे पोटाचे आजार, अन्न विषबाधा, उलट्या, अतिसार इत्यादी आजार होऊ शकतात. तसेच नेहमीच नख चावून खाल्यामुळे दातांच्या मुळांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

चहा बनवताना वापरले जाणारे ‘हे’ पदार्थ आतड्यांचे आरोग्य करतात खराब, जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत

‘ही’ सवय सोडण्यासाठी उपाय:

  • आठवड्यातून एकदा नखं कापावीत. यामुळे नखांमधील घाण पोटात जाणार नाही.
  • नखांवर बँड-एड लावल्यास अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात.
  • ज्यावेळेस तुम्हाला नख चावून खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही बबल गम किंवा च्युइंग गम खाऊ शकता. यामुळे नख खाण्याची सवय मोडली जाईल.

FAQs (संबंधित प्रश्न)

नखे चावणे ही एक वैद्यकीय स्थिती आहे का?

नखे चावणे हे अधिकृतपणे मानसिक विकार म्हणून वर्गीकृत केलेले नसले तरी, ते ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) किंवा चिंता विकारांसारख्या आजारांशी संबंधित असू शकते. काही प्रकरणांमध्ये, ते एक प्रकारचे स्व-सौंदर्य वर्तन किंवा स्टिरियोटाइपिक हालचाली विकार मानले जाऊ शकते.

मुलांमध्ये नखे चावणे रोखणे शक्य आहे का?

जेव्हा एखाद्या मुलाला चावण्याची इच्छा होते तेव्हा त्यांना इतर कामांमध्ये सहभागी होण्यास किंवा त्यांचे हात दुसऱ्या गोष्टीसाठी वापरण्यास प्रोत्साहित करा.मुलांना ताणतणाव व्यवस्थापित करण्याच्या निरोगी मार्गांबद्दल शिक्षित करणे, जसे की खोल श्वास घेणे किंवा विश्रांती तंत्रे, फायदेशीर ठरू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Stop biting your nails frequently these serious diseases will arise in relation to health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issues
  • Nail Care

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.