चहा बनवताना वापरले जाणारे 'हे' पदार्थ आतड्यांचे आरोग्य करतात खराब
जगभरात असंख्य चहाप्रेमी आहेत. सकाळी उठल्यानंतर अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय सुस्ती कमी होत नाही. ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी किंवा कॉफी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची पेय सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी प्यायली जातात. पण उपाशी पोटी चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढण्यासोबतच पित्ताचा त्रास होतो. तसेच शरीरात आम्ल्पित्त वाढून आंबट ढेकर येणे, उलटी, मळमळ होण्याची जास्त शक्यता असते. चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा दूर होतो. पण याच चहाचे उपाशी पोटी सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला चहामधील कोणते पदार्थ आतड्यांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात आणि चहा बनवण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
Premature Ovarian Insufficiency महिलांकरिता ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी ठरतेय आशेचा किरण
चहा पावडर, दूध, गूळ आणि साखरेचा वापर करून चहा बनवला जातो. मात्र बऱ्याच घरांमध्ये गूळ, साखर किंवा दूध एकत्र मिक्स करून चहा बनवला जातो. पण या पद्धतीने चहा बनवणे अतिशय चुकीचे आहे. आयुर्वेदानुसार हे तिन्ही पदार्थ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होते. सकाळी उठल्यानतंर मसालेदार चहाचे सेवन केले जाते. पण याच चहामुळे पचनसंस्था, रक्तशर्करा आणि लिव्हरवर वाईट परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी उपाशी पोटी चहा पिणे टाळावे.
दिवसभरात पाच ते सहा वेळा काहींना चहा पिण्याची सवय असते. पण वारंवार चहाचे सेवन केल्यामुळे मधुमेह,उच्च रक्तदाब किंवा इन्सुलिनच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. चहामध्ये असलेल्या साखरेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते आणि मधुमेह होतो. मधुमेह झाल्यानंतर साखरेचा वापर न करता बनवलेल्या चहाचे सेवन करावे. यामुळे इन्सुलिनच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाहीत.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहासोबत चपाती किंवा बिस्कीट खाण्याची सवय असते. पण सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटीचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्याला हानी पोहचते. चहासोबत समोसे, चिवडा, बिस्किटं, भजी इत्यादी मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाऊ नये. हे पदार्थ खाल्ल्यास ऍसिडिटी, गॅस आणि पचन विकार होण्याची जास्त शक्यता असते.
Weight Loss पासून इम्युनिटी वाढवेपर्यंत अंजीर ठरते ‘रामबाण’, आरोग्यासाठी फायदे
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दुधाचा चहा पिण्याऐवजी हर्बल चहाचे किंवा आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांपासून बनवलेल्या चहाचे सेवन करावे. या चहामध्ये असलेले घटक शरीराला पोषण देतात. दूध व साखर विरहित, हर्बल किंवा हलकी ग्रीन टी इत्यादी हलक्या फुलक्या चहाचे सेवन करावे. यामुळे शरीर कायमच निरोगी राहील.
चहाचे विविध प्रकार कोणते?
काळा चहा, ग्रीन टी, लिंबू चहा, मसाला चहा, उन्हाळी चहा, हर्बल चहा
चहा पिण्याचे फायदे काय आहेत?
चहा प्यायल्याने ताजेतवाने वाटते.काही चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स (antioxidants) असतात, जे आरोग्यासाठी चांगले असतात.ग्रीन टी (Green tea) वजन कमी करण्यास मदत करते, असे मानले जाते.चहा पिण्याची सवय (Tea drinking habit) काही लोकांसाठी तणाव कमी करण्यास मदत करते.
चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी चहा पिणे चांगले मानले जाते.जेवण झाल्यावर लगेच चहा पिऊ नये.रात्री झोपण्यापूर्वी चहा पिणे टाळावे, कारण त्यामुळे झोप उडते.