Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : तेच तेच कशाला? यंदा काहीतरी वेगळं ट्राय करा; घरी बनवा क्रमी अँड टेस्टी ‘पनीर यखनी’, रेसिपी आहे मजेदार

Paneer Yakhni Recipe : पनीर यखनी हा काश्मिरचा एक लोकप्रिय पदार्थ आहे. यात दही आणि काही मसाल्यांचा वापर करुन क्रिमी ग्रेव्ही तयार केली जाते आणि मग त्यात मऊसर पनीरचे तुकडे घातले जातात.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2026 | 09:30 AM
Recipe : तेच तेच कशाला? यंदा काहीतरी वेगळं ट्राय करा; घरी बनवा क्रमी अँड टेस्टी 'पनीर यखनी', रेसिपी आहे मजेदार

Recipe : तेच तेच कशाला? यंदा काहीतरी वेगळं ट्राय करा; घरी बनवा क्रमी अँड टेस्टी 'पनीर यखनी', रेसिपी आहे मजेदार

Follow Us
Follow Us:
  • पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे.
  • तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पनीरपासून अनेक पदार्थ तयार करु शकता.
  • आज आपण पनीर यखनीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
पनीरचे अनेक पदार्थ तुम्ही खाल्ले असतील पण तुम्ही कधी यखनी पनीर रेसिपी ट्राय केली आहे का? कश्मीरी स्वादाची खास ओळख असलेली यखनी पनीर ही एक सौम्य, सुगंधी आणि अतिशय स्वादिष्ट डिश आहे. दह्याच्या ग्रेव्हीमध्ये तयार होणारी ही रेसिपी मसाल्यांचा अतिरेक न करता हलक्या चवीतही अप्रतिम लागते.

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा लहान मुलांच्या आवडीचा ‘ओरिओ मिल्कशेक’, काही मिनिटांची रेसिपी

पनीरचे मऊ तुकडे, बडीशेप आणि सुंठ पावडरचा खास फ्लेवर यामुळे या पदार्थाला वेगळीच चव मिळते. जेवणात काहीतरी रॉयल आणि वेगळं बनवायचं असेल तर यखनी पनीर हा उत्तम पर्याय ठरतो. ही डिश नान, जीरा राईस किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. घरी पाहुणे येत असतील किंवा खास प्रसंग असल्यास त्यावेळी तुम्ही ही रेसिपी करुन पाहू शकता. चला रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • 250 ग्रॅम पनीर
  • 1 कप घट्ट दही
  • 2 टेबलस्पून तेल किंवा तूप
  • 1 तमालपत्र
  • 1 दालचिनी तुकडा
  • 2 हिरव्या वेलदोड्या
  • 1 टीस्पून बडीशेप पावडर
  • 1/2 टीस्पून सुंठ पावडर
  • 1/2 टीस्पून हळद
  • चवीनुसार मीठ
  • 1 कप पाणी
  • थोडी कोथिंबीर सजावटीसाठी
Moong Dal Halwa: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल मूग डाळ हलवा, नोट करा सोपी रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम पनीरचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून बाजूला ठेवा.
  • एका भांड्यात दही व्यवस्थित फेटून त्यात बडीशेप पावडर, सुंठ पावडर आणि हळद मिसळा.
  • कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी आणि वेलदोडे परता.
  • आता तयार दह्याचे मिश्रण मंद आचेवर घाला आणि सतत हलवत शिजवा, जेणेकरून दही फाटणार नाही.
  • मिश्रणाला हलकी उकळी आल्यावर त्यात पाणी आणि मीठ घालून ग्रेव्ही थोडी घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • त्यानंतर पनीरचे तुकडे घालून 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या, त्यामुळे मसाल्याचा स्वाद पनीरमध्ये मुरेल.
  • शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम यखनी पनीर नान किंवा भातासोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Stop making boring food try paneer yakhni recipe at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • marathi recipe
  • paneer
  • veg

संबंधित बातम्या

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
1

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘
3

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश
4

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.