कपडे स्वच्छ करण्यासाठी सतत डिटर्जंटचा वापर करत असाल तर थांबा! नव्याकोऱ्या कपड्यांना पोहचू शकते हानी
भारतीय घरांमध्ये कपडे धुण्याचा दिवस हा एक मोठा कार्यक्रमच असतो. कपड्यांनी भरलेल्या बादल्या, पाण्यात सढळपणे टाकलेली डिटर्जंट पावडर आणि पूर्णपणे स्वच्छ, चमकदार पांढऱ्याशुभ्र कपड्यांची अपेक्षा. पण तुम्हाला माहितीय का; डिटर्जंटचा तो सहज घेतलेला मुठभर भाग तुमच्याच विरोधात काम करत असू शकतो. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या पर्सनल केअर आणि होम केअरसाठीच्या संशोधन आणि विकास विभागाचे ग्लोबल हेड संदीप नाईक, यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – istock)
मुंबई, बंगळुरू, दिल्ली-एनसीआर, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, पुणे आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये (हार्ड वॉटर) जड पाणी ही एक मोठी समस्या आहे. जड पाण्यामुळे स्वच्छता करणे अधिक कठीण होते त्यामुळे अनेक लोक अतिरिक्त म्हणजे बहुतेक वेळा दुप्पट डिटर्जंट घालतात. स्ट्रीट फूड किंवा पावसाळ्यातील चिखलामुळे झालेले सहजी न निघणारे डाग त्यामुळे निघतील असं त्यांना वाटत असतं. मात्र वास्तव वेगळीच गोष्ट सांगते.
जास्त प्रमाणात डिटर्जंट वापरल्याने अधिक स्वच्छता होत नाही. उलट त्यामुळे कपड्यांवर साबणाचा थर तयार होतो. तो घाण आणि दुर्गंधी अडकवून ठेवतो. कपडे कडक होतात आणि तुमच्या वॉशिंग मशीनला असे कपडे धुण्यासाठी जास्त ऊर्जा घालवावी लागते. कालांतराने, हा साठा कपडे आणि उपकरणे दोन्हींचे आयुष्य कमी करतो आणि एक साधे काम महागड्या दुरुस्तीत बदलते.
भारतामध्ये जिथे पाण्याची कमतरता आणि जड पाणी हे रोजचे वास्तव आहे तिथेतर ही समस्या आणखी खोलवर आहे. घरगुती कपडे धुण्याच्या सवयींवरील संशोधन अभ्यास हे दर्शवितात की बहुतेक ग्राहक आवश्यकतेपेक्षा दुप्पट किंवा त्याहून अधिक डिटर्जंट वापरतात. यामागे मुख्य कारण म्हणजे योग्य प्रमाण आणि पाण्याचा जडपणा याबद्दल फारशी माहिती नसते. या अति वापरामुळे केवळ पैसे वाया जात नाहीत, तर अतिरिक्त रिंस सायकल्स (कपडे खळबळून धुण्याच्या वेळा) लागतात. त्यामुळे आधीच टंचाई असलेल्या भागांमध्ये अधिक पाणी खर्च होते.
भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पावडर डिटर्जंट या समस्येत आणखी भर घालू शकतात. त्यामध्ये सहसा खनिज-आधारित फिलर्स असतात जे पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत. हे न विरघळणारे कण कपड्यांवर तसेच राहतात. सोड्यामुळे लिंट म्हणजेच कपड्यांचे सूक्ष्म सुटलेले तंतू वॉशिंग मशीन/ड्रायरमध्ये साचल्यास ब्लॉकेज होऊ शकते आणि वॉशिंग मशीनमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो.
याच्या उलट लिक्विड डिटर्जंट पाण्यात लवकर विरघळतात, अधिक अचूक प्रमाणात वापरता येतात आणि कोणताही गाळाचा भाग मागे सोडत नाहीत. लिक्विड फॉर्म्युलेशन्स साधारणतः कपड्यांसाठी अधिक सौम्य असतात. बहुतेक वेळा फॉस्फेट-फ्री असतात आणि प्रभावी स्वच्छतेसह कपड्यांची काळजी घेण्यासाठी तयार केलेले असतात. चुकीच्या डिटर्जंटमुळे उद्भवणाऱ्या समस्येवरील उपाय अधिक उत्पादन वापरण्यात नाही तर जागरूकतेपासून सुरू होतो. अंदाजाने न वापरता नेहमी डिटर्जंट मोजून वापरा. मशीन वॉशसाठी 5-7 किलो कपड्यांच्या लोडसाठी सुमारे 2-3 टेबलस्पून (अंदाजे 30-60 मिली) सामान्यतः पुरेसे असते तर हाताने धुण्यासाठी कपड्यांचे प्रमाण आणि स्वच्छतेची गरज यानुसार याहून कमी प्रमाण आवश्यक असते. हट्टी डागांवर आधी योग्य उपाय केल्यास अतिरिक्त डिटर्जंटची गरज कमी होते.
फ्रंट-लोड वॉशिंग मशीन भारतीय घरांमध्ये अधिक प्रमाणात वापरले जाते. यासाठी पाणी कमी लागते आणि त्यामुळे कमी डिटर्जंटची गरज असते. या मशीनमध्ये जास्त डिटर्जंट वापरल्यास खूप फेस तयार होऊ शकतो. त्यामुळे ड्रममध्ये गाळ आणि साठा तयार होतो. फॅब किंवा जेन्टील सारख्या लो-फोमिंग लिक्विड डिटर्जंट्समध्ये आधुनिक वॉशिंग मशीनसाठी डिझाइन केलेली फॉर्म्युलेशन्स आहेत. ही उत्पादने या सायकल्ससाठी अधिक योग्य असतात कारण ती अतिरिक्त फेस न तयार करता प्रभावी स्वच्छता करतात आणि कपडे व मशीन दोन्हींचे संरक्षण करतात.
लिक्विड डिटर्जंटचा आणखी एक फायदा त्यांच्या फॉर्म्युलेशनमध्ये आहे. लिक्विड डिटर्जंट सहज विरघळतात आणि कोणताही थर, गाळ मागे सोडत नाहीत. त्यामुळे ते कपड्यांसाठी अधिक सौम्य असतात. घासण्याचा किंवा खरवडण्याचे गुणधर्म असलेली खडबडीत खनिजे पावडर डिटर्जंटमध्ये असतात. त्यामुळे घर्षण वाढते. तसेच त्यामुळे लिंट वाढू शकते. लिक्विड डिटर्जंट अधिक सहजतेने स्वच्छ करतात आणि कपड्यांची झीज कमी करण्यास मदत करतात.
लिक्विड आणि पॉड-आधारित डिटर्जंट आता भारतात त्यांचा सोयीस्कर वापर आणि योग्य प्रमाणामुळे हळूहळू लोकप्रिय होत आहेत. अंदाजे पावडर वापरण्याची गरज संपवून ते अतिरिक्त वापर टाळण्यास मदत करतात, कोणताही थर, गाळ ठेवत नाहीत आणि कपडे धुण्याच्या अधिक टिकाऊ पद्धतींना पाठबळ देतात. ग्राहक कपड्यांची काळजी, उपकरणांचे आयुष्य आणि पर्यावरणीय परिणाम याबद्दल अधिक जागरूक होत असताना, योग्य प्रमाणात डिटर्जंट मोजणे आणि योग्य फॉर्म्युलेशन निवडणे अशा रोजच्या सवयींमध्ये छोटे बदल महत्त्वपूर्ण फरक घडवू शकतात.






