अकोल्याच्या जुने शहर परिसरातील भावना घाटोळे या विवाहित महिलेने आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाच वर्षांपूर्वी भावना यांचा विवाह विशाल घाटोळे यांच्यासोबत झाला होता. त्यांना अवघं 14महिन्यांचं बाळ आहे. मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सतत हुंड्यासाठी टोमणे, मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. “आम्ही श्रीमंत आहोत, तुमच्याकडून काहीच मिळालं नाही,” अशा शब्दांत भावनाला वारंवार अपमानित केलं जात होतं, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. घटनेच्या दिवशी सकाळी 9 ते 9.30 च्या दरम्यान भावनाने वडिलांना फोन करून “मला इथून घेऊन चला, मला खूप त्रास देतात,” अशी आर्त विनंती केली होती. मात्र काही तासांतच जावयाचा फोन आला आणि “तुमची मुलगी लटकली,” अशी माहिती देण्यात आली.