Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mood Swings: तणावामुळे महिलांमध्ये वाढतेय मूड स्विंग्जची समस्या, तज्ज्ञांचा अभ्यास

तणाव हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालाय. विशेषतः महिलांना याचा जास्त त्रास होताना दिसतो असे तज्ज्ञांनी सांगितले. मूड स्विंगची ही समस्या तणावामुळे जास्त वाढत चालली आहे असं सांगण्यात आलंय

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 12, 2025 | 02:48 PM
तणावामुळे वाढत आहेत मूड स्विंग्ज (फोटो सौजन्य - iStock)

तणावामुळे वाढत आहेत मूड स्विंग्ज (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

तणावामुळे महिलांना चिंता आणि नैराश्यासारखे समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे वेळीच समजून घेतल्यास महिलांचे मासिक आरोग्य आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि मूड स्विंग्ज टाळण्यास मदत होऊ शकते. डॉ. श्वेता लालगुडी, स्त्रीरोग तज्ज्ञ, झायनोवा शाल्बी हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

तणाव हा दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. तो व्यावसायिक किंवा वैयक्तिक समस्या, घटस्फोट, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, आर्थिक संकट किंवा अगदी कोणत्याही मानसिक आघातामुळे किंवा अपघातामुळे उद्भवू शकतो. वाढता ताणतणाव हा एखाद्या महिलेच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. तज्ज्ञांनी केलेल्या विविध अभ्यासांनुसार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही चिंता आणि नैराश्यासारख्या मूड डिसऑर्डरचा धोका असतो. हार्मोनल बदल, ठराविक जबाबदाऱ्या, सामाजिक दबाव आणि मल्टीटास्किंगमुळे (एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळणे) मूड डिसऑर्डर होण्याची शक्यता वाढते.

मानसिक तणाव असल्यास शरीर देतं हे 5 संकेत, चुकुनही करु नका दुर्लक्ष

तणाव आणि मूड डिसऑर्डरमधील संबंध 

नक्की संबंध काय

तणाव मेंदू आणि शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करतो. महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती संबंधित हार्मोनल चढउतार मेंदूवर येणाऱ्या तणावाला  आणखी तीव्र करू शकतात. सामाजिक अपेक्षा अनेकदा महिलांना एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडण्यास भाग पाडते , जसे की घर आणि नोकरी सांभाळणे यामुळे एकाच वेळी अनेक भुमिका निभावताना तणावाचा सामना करावा लागू शकतो. 

कालांतराने या वाढत्या ताणामुळे मानसिक थकवा, चिडचिडेपणा तसेच आपल्या आरोग्याकडे व आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करणे आणि सतत दुःख वाटु शकते, जी मूड डिसऑर्डरची लक्षणे आहेत. दीर्घकालीन ताणतणाव हे मूड नियंत्रित करण्यासाठी आवश्यक सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी कमी करते. यामुळे एखाद्या व्यक्तीला चिडचिडेपणा, एकटेपणा आणि नैराश्याचा सामना करावा लागू शकतो.

तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

तणाव कमी करण्यासाठी काय करावे

  • महिलांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य चांगले रहावे याकरिता योगा, ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम, वाचन, स्पा किंवा मालिश किंवा स्वतःला फ्रेश वाटावे यासाठी आंघोळ करणे देखील फायदेशीर ठरु शकते
  • मूड चांगला रहावा यासाठी  तुम्ही गाणी ऐकू शकता, नृत्य करू शकता, बागकाम करू शकता, कोणताही छंद जोपासू शकता किंवा एखादी नवीन कला शिकू शकता
  • दररोज व्यायाम करणे,पौष्टिक आहाराचे सेवन करणे, रोजनिशी लिहीणे, कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ मनमोकळ्या गप्पा मारत वेळ घालवणे, जास्तीत जास्त ८ तास गाढ झोप घेणे, गरज भासल्यास समुपदेशकांची मदत घेणे गरजेचे आहे
  • सामाजिक दबावाखाली येऊन काम न करता ज्यावेळी एखादी गोष्ट करणे जमणार नाही तेव्हा नाही म्हणायला शिका आणि कामं वाटून घ्या. महिलांना या टिप्स फॉलो करुन सुखी आणि निरोगी आयुष्य जगता येईल

मानसिक तणाव जाणवतोय ? महिलांनो ! ‘या’ लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करु नका

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Stress is increasing the problem of mood swings in women expert study finds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • mental stress

संबंधित बातम्या

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
1

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
2

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato
3

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!
4

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.