पांढऱ्या भिंतीवरील हट्टी डाग क्षणातच होतील दूर; या जुगाडाने घरातील कोपरान कोपरा करा साफ
घरात लहान मुले असली की आपल्या भिंती काही कोऱ्या राहत नाहीत. मुलांना घरच्या भिंतींवर कोरीवकाम करायला फार आवडते. मात्र त्यांचा हा आनंद आपल्यासाठी एक मोठा त्रास ठरू शकतो. कारण भिंतीवर लागलेले हे डाग काढून टाकणे काही सोपी गोष्ट नाही. मुळातच भिंतींवरील डाग सहजा सहजी काढून टाकता येत नाही.
गॅस झाल्यावर नाभीमध्ये लावा तेल, Navel Oiling चा शरीरावर कसा पडतो फरक
यामुळे आपल्या घराचा लूकही खराब होतो आणि घराच्या भिंती घाण दिसू लागतात. अशात आज आम्ही तुमच्यासाठी काही साधे-सोपे घरगुती जुगाड घेऊन आलो आहोत ज्यांच्या वापराने तुम्ही भिंतींवरील हट्टी डाग सहज स्वछ करू शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याचीही गरज भासणार नाही. चला तर मग या भिंतींवरील हट्टी डाग दूर करण्यासाठी मदतीच्या ठरणाऱ्या घरगुती पद्धतींविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेअर ड्रायर
आपले हेअर सेट करण्यासाठी वापरले जाणारे हेअर ड्रायर तुमच्या घरातील भिंतींवरील हट्टी डाग दूर करण्यास तुमची मदत करतील. हेअर ड्रायरची गरम हवा क्रेयॉनचा रंग मऊ करते, ज्यामुळे डाग साफ करणे सोपे होते. याचा वापर करण्यासाठी प्रथम हेअर ड्रायर गरम करा आणि याची गरम हवा डाग असलेल्या भागावर थेट २०-३० सेकंदांसाठी सुरु ठेवा. गरम हवा क्रेयॉनला थोडं वितळण्यास मदत करेल. यानंतर, मऊ कापड किंवा स्पंजच्या मदतीने डाग हळूहळू स्वच्छ करा. लक्षात ठेवा की जास्त गरम हवा भिंतीवरील पेंटिंगला नुकसान करत नाही.
टूथपेस्टचा वापर
पांढरा टूथपेस्ट डाग काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. यामधील रासायनिक घटक भिंतीवरील डाग दूर करण्यास मदत करतात. आता याचा वापर करण्यासाठी प्रथम थोडी टूथपेस्ट घ्या आणि मऊ ब्रश अथवा कापडाने डागांवर घासून घ्या. नंतर हे ओल्या कपड्याने स्वछ करा.
सोडा बायकार्बोनेट आणि पाणी
एक चमचा सोडा बायकार्बोनेट थोड्या पाण्यात मिसळा आणि एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट भिंतींवर लावून काहीवेळ तशीच राहूद्या आणि मग नंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका. व्हाईट व्हिनेगर देखील डाग काढून टाकण्यास मदत करतो. यासाठी स्पंजमध्ये व्हिनेगर टाका आणि डागावर हलक्या हाताने घासून घ्या. नंतर ओल्या कापडाने डाग स्वछ करा.
रबर इरेजरचा वापर करा
कधीकधी रंगीत रंगाच्या डागांसाठी एक साधा रबर इरेजर देखील प्रभावी उपाय ठरू शकतो. यासाठी एक रबर इरेजर घ्या आणि हलक्या हाताने घासून हे डाग पुसून काढा. भिंतीवरून रंग निघणार नाही याची काळजी घ्या.
या गोष्टी ध्यानात असूद्यात
डाग काढून टाकण्यासाठी कोणताही उपाय किंवा पद्धत वापरण्यापूर्वी, भिंतीच्या लहान आणि लपलेल्या भागावर त्याची टेस्टिंग करून घ्या, जेणेकरून भिंतींवरील रंग खराब होणार नाही. डाग स्वछ करताना जोरजोरात घासणे टाळा, यामुळे भिंतीचा रंग सोलून निघू शकतो. साफसफाई केल्यानंतर कोरड्या आणि स्वछ कापडाने भिंत पुसून काढा.