(फोटो सौजन्य: istock)
आपला भारत देश त्याच्या मसाल्यांमुळे आणि चवदार पदार्थांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. भारतात अनेक वेगवेगळी राज्ये आहेत आणि या प्रत्येक राज्यात तुम्हाला एक वेगळी आणि अनोखी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. भारतात तुम्हाला नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत अनेक वेगवगेळे पदार्थ पाहायला मिळतील ज्यांची गणना करणे फार कठीण आहे. कुठे डोसा फेमस आहे तर कुठे वडा पाव तर कुठे चाट… भारतीय पदार्थ इतके लज्जतदार असतात की त्यांची चव चाखण्यासाठी अनेकदा विदेशी पर्यटक खास भारतात येतात. हेच कारण आहे की जगभरात भारतीय पदार्थांची आपली अशी वेगळी ओळख आहे.
ट्रॅव्हलर्सची पहिली पसंती बनत आहे Naked Flying; काय आहे यात इतकं खास? चला जाणून घेऊया
नुकतेच अॅटलासने जगातील टॉप ५० नाश्त्याच्या पदार्थांची यादी शेअर केली आहे. यात जगभरातील अनेक पदार्थांचा समावेश आहे आणि त्यातच यात भारतानेही आपली बाजी मारल्याचे ठळक दिसून आले आहे. भारताच्या ३ प्रमुख पदार्थांचा यात समावेश करण्यात आला आहे. यावरून भारतीय पदार्थांचा डंका जगभर किती लोकप्रिय आहे हे समजते. केवळ आपणच नाही तर परदेशी लोकही हे नाश्त्याचे पदार्थ आवडीने खातात आणि त्यांची मजा लुटतात. चला भारताचे हे ३ पदार्थ नक्की कोणते आहेत ते जाणून घेऊया.
लिस्टमध्ये हे ३ भारतीय पदार्थ आहेत सामील
टेस्ट अॅटलास ही एक ऑनलाइन साईट आहे जी जगभरातील खाद्यपदार्थांचे मूल्यांकन करते. अलिकडेच, टेस्ट अॅटलासने जगातील टॉप ५० नाश्त्याची यादी सादर केली आहे. यामध्ये भारतातील ३ खास नाश्त्याच्या पदार्थांचा समावेश आहे. तर यात महाराष्ट्राच्या फेमस मराठमोळ्या पदार्थाचाही समावेश करण्यात आले आहे. या यादीत मिसळ १८ व्या क्रमांकावर, पराठा २३ व्या क्रमांकावर आणि पंच-पॅकिंग पंजाबी छोले भटुरे ३२ व्या क्रमांकावर आहे. ८ जून रोजी, TasteAtlas ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही यादी शेअर केली. या पोस्टला, “हे जगातील सर्वोत्तम नाश्ता आहेत!” असे कॅप्शन देण्यात आले. या यादीत तुर्कीचा काहवाली प्रथम स्थानावर आहे, त्यानंतर सर्बियाचा कॉम्प्लेट लेपिंजा आणि जगभरात आढळणारे क्रोइसंटलाही लिस्टमध्ये यादीत सामील करण्यात आले आहे.
डोळ्यांभोवती वाढलेले डार्क सर्कल्स कमी करण्यसाठी ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, डोळे होतील सुंदर
आम्ही तुम्हाला सांगतो की समोसा, छोले भटुरे, पराठे, इडली डोसा, पोहे, वडा पाव, मिसळ पाव आणि कचोरी हे भारतातील फेमस नाश्त्याचे पदार्थ आहेत. देशाच्या कोणत्याही भागात तुम्हाला हे नाश्त्याचे पदार्थ परवडणाऱ्या किमतीत तुम्हाला कुठेही खायला मिळतील. चवीने भरलेले हे पदार्थ जगभर फार आवडीने खाल्ले जातात.