नवरा बायकोने कसे झोपणे ठरेल उत्तम (फोटो सौजन्य - iStock)
लग्न हा असा विषय आहे की, ‘शादी का लड्डू खाए वह पछताएँ और ना खाए वह भी पछताएँ’. बरेचदा हल्ली शारीरिक सुख मिळत नसल्याच्या कारणानेही घटस्फोट होताना दिसून येत आहेत. तर घटस्फोट वाढल्याचे चित्र अनेक देशांमध्ये दिसून येत आहे. अशावेळी Cotton USA ने केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की जे जोडपे नग्न झोपतात ते पायजमा किंवा नाईटी घालणाऱ्या जोडप्यांपेक्षा जास्त आनंदी असतात. हो, तुम्ही योग्यच वाचत आहात. यामध्ये कुठेही अश्लीलता पसरविण्याचा आमचा हेतू नाही. तर सर्वेक्षणातूनही आता हे समोर आले आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जोडप्यांपैकी, नग्न झोपणाऱ्या ५७% जोडप्यांनी आनंदी असल्याचे सांगितले, तर पायजमा घातलेल्या ४८% आणि वॉन्सी घातलेल्या ३८% जोडप्यांनी आनंदी असल्याचे सांगितले. तज्ज्ञ स्टेफनी रॅटक्लिफ असे सुचवतात की Nude झोपल्यामुळे जवळीक आणि मोकळेपणा वाढतो.
सुखी विवाहामागील कारणे
सुखी वैवाहिक जीवनामागे अनेक कारणे असतात. पण एक कारण असेही आहे ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल. एका अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही रात्री बेडवर तुमच्या जोडीदारासोबत नग्न झोपलात तर तुमच्या जोडीदारासोबतचे नाते आणखी चांगले होते. लग्नानंतर दररोज रात्री जर तुम्ही हे केले तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल सामान्य दिवसांपेक्षा जास्त प्रेम वाटू लागेल. कपडे घालून झोपणाऱ्या जोडप्यांपेक्षा असे जोडपे जास्त आनंदी आयुष्य जगतात.
बायकोने नवऱ्याच्या कोणत्या बाजूला झोपावे? योग्य दिशा मिळवून देईल सुख-संपत्ती
कसा झाला अभ्यास
हा अभ्यास एकूण १००४ लोकांवर करण्यात आला, त्यापैकी ५७ टक्के जोडपी अशी होती जी रात्री बेडवर एकमेकांसह Nude होऊन झोपायची आणि त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होती. यासोबतच, ४८ टक्के जोडपी पायजमा घालून झोपत असत आणि ४३ टक्के जोडपी रात्रीचे कपडे घालून झोपत असत. याशिवाय, सुमारे ३८ टक्के अशी जोडपी होती जी हलके आणि सैलसर कपडे घालून झोपायची.
युकेमधील पोर्ट्समाउथ येथील ३३ वर्षीय स्टेपन मॅकेन्झी म्हणाले की, ते गेल्या ६ वर्षांपासून त्याच्या पत्नीसोबत नग्न झोपत आहे आणि त्याच्या आयुष्यात ते खूप आनंदी आहे. त्यांना असे झोपणे देखील आरामदायक वाटते. स्टेपनने सांगितले की त्याची पत्नीही त्याच्यासोबत त्याच स्थितीत झोपते आणि दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत.
सुखी संसारानंतरही नवरा का देतो बायकोला धोका? 4 कारण वाचून तुमच्या डोक्याचा होईल भुगा
सर्व्हेक्षणात आले समोर
एका अमेरिकन कापूस कंपनीचे मालक स्टीफन थायर म्हणाले की, संबंध सुधारण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात आणि हे त्यापैकी एक असू शकते. तसेच तुमच्या बेडरूममधील वातावरण हा एक प्रमुख घटक आहे. बेड मऊ असल्याने लोक नग्न झोपणे देखील पसंत करतात. या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की नातेसंबंध सुधारण्यासाठी बेडरूममधील वातावरण देखील रोमँटिक असले पाहिजे.
काय आहे अभ्यास