सतत होणाऱ्या ॲसिडिटी आणि डोके दुखीमुळे त्रस्त आहात? मग 'या' पद्धतीने करा हिरव्या वेलचीचे सेवन
दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे सेवन, शिळ्या अन्नपदार्थांचे सेवन इत्यादी गोष्टींचा परिणाम पचनक्रिया लगेच दिसून येतो. शिळ्या पदार्थांच्या सेवनामुळे पोटात दुखणे, अपचन किंवा ॲसिडिटी वाढू लागते. त्यामुळे आहारात नेहमीच हेल्दी आणि पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. बऱ्याचदा शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्य बिघडण्याचे कारण बनतात. कारण यामुळे अपचन, ॲसिडिटी, सतत डोके दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. ॲसिडिटी झाल्यानंतर काहींना सतत डोके दुखीचा त्रास होतो.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेली ॲसिडिटी आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी हिरव्या वेलचीचे सेवन करावे. हिरवी वेलची आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय गॅस, अपचन, तोंडाची दुर्गंधी आणि आम्लता इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिरव्या वेलचीचे सेवन करावे.आज आम्ही तुम्हाला ऍसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी हिरव्या वेलचीचे सेवन कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने हिरव्या वेलचीचे सेवन केल्यास तात्काळ ऍसिडिटी नियंत्रणात राहील.
जेवल्यानंतर आपल्यातील अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. मात्र बडीशेप सोबतच कधीतरी वेलचीचे सेवन केल्यास जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होतील. गॅस, अपचन किंवा पोटाची समस्या उद्भवत असेल तर नियमित जेवणानंतर वेलची खावी. वेलचीच्या आतील दोन किंवा तीन दाणे खाल्यास पोटासंबंधित समस्यांपासून लगेच आराम मिळेल. वेलचीमध्ये असलेले गुणकारी घटक पोटाच्या स्नायूंना आराम देतात. त्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात.
पोटात वाढलेले गॅस, अपचन किंवा छातीत जळजळ किंवा ढेकर येत असतील तर हिरव्या वेलचीचे सेवन करावे. हिरवी वेलची खाल्यास कायमचा आराम मिळेल. पोटात वाढलेले पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी हिरवी वेलची किंवा हिरव्या वेलचीचे पाणी प्यावे. वेलचीमध्ये आढळून येणारे नैसर्गिक तेल शरीरात साचून राहिलेले वायू बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटत नाही. वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे छातीत वाढलेली जळजळ कमी होते.
वाढलेले वजन कमी करताना अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. मात्र कोणत्याही प्रोटीनशेकचे सेवन करण्याऐवजी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. वेलचीचे पाणी वाढलेले वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यास महिनाभरात पोटावर वाढलेली चरबी कमी होईल आणि लगेच आराम मिळेल.