पोटावर लटकलेली चरबी झपाट्याने होईल कमी! उपाशी पोटी नियमित करा 'या' घरगुती नॅचरल ड्रिंकचे सेवन
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी वाढू वाढते. याशिवाय पोटावर लटकलेल्या चरबीमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. यामुळे शरीरात मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. शरीरावर वाढलेली चरबी योग्य वेळी कमी न केल्यास आरोग्यासंबंधित इतर अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. अनेक लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, आहारात प्रोटीनशेकचे सेवन करणे इत्यादी अनेक गोष्टी करतात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी हानिकारक आहे. या विषारी घटकांमुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते. शरीरावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना आहारात कोणत्या हेल्दी ड्रिंकचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती पेयांचे आहारात नियमित सेवन केल्यामुळे शरीरावर वाढलेली चरबी कमी होईल. तसेच घरगुती पदार्थांच्या मदतीने आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या दूर होतात.
वाढलेले वजन कमी करताना महागातल्या हानिकारक पेयांचे सेवन करण्याऐवजी घरगुती आणि नॅचरल पेयांचे सेवन करावे. हे पेय वजन कमी करण्यासोबतच आरोग्य कायम निरोगी ठेवण्यासाठी मदत करेल. मागील अनेक वर्षांपासून वजन कमी करताना प्यायले जाणारे प्रभावी पेय म्हणजे धणे जिऱ्याचे पाणी. या पाण्याच्या सेवनामुळे पोटात आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. यासोबतच हे पेय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा प्यायल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. चला तर जाणून घेऊया धणे जिऱ्याचे पाणी तयार करण्याची कृती.
योगासने करण्याआधी अंघोळ करावी की नंतर? जाणून घ्या प्रेमानंद महाराजांनी दिलेला मोलाचा सल्ला
धणे जिऱ्याची पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरं आणि धणे टाकून रात्रभर तसेच ठेवा. रात्रभर पाणी ठेवल्यानंतर सकाळी ते पाणी उकळवून घ्या. त्यानंतर पाणी थंड करून उपाशी पोटी सेवन करा. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेली सर्व घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. जिऱ्याचे पाणी पचनासाठी अतिशय प्रभावी आहे. या पाण्याच्या सेवनामुळे पोटात वाढलेली ऍसिडिटी, पित्त किंवा पोटाच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळतो.