पावसाळ्यात वारंवार पोटात दुखत असेल तर 'हे' घरगुती उपाय करून लगेच मिळवा आराम
राज्यासह संपूर्ण देशभरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरण असते. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढू लागतात. बाहेरील तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय काहींच्या वारंवार पोटात दुखू लागते. सतत बाहेरील पदार्थ खाल्यामुळे पोटात दुखणे, उलट्या, जुलाब इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. दूषित पाणी शरीरात गेल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडू लागते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरील तिखट, तेलकट आणि इतर शरीरास हानिकारक ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये.(फोटो सौजन्य – istock)
8 दिवस उलट्या, मासिक पाळीलाही अडचण; डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून काढला १० किलोचा गोळा
पावसाळ्यात कधी थंड तर कधी उष्ण वातावरण असते. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांना हानी पोहचते.साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात वारंवार पोटात का दुखते? सततच्या पोट दुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे पचनक्रिया सुद्धा कायमच निरोगी राहील आणि शरीराला अनेक फायदे होतील.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चुकूनही बाहेरील पाण्याचे सेवन करू नये. नेहमीच गरम पाण्याचे सेवन करावे. गरम पाणी प्यायल्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यासोबतच आतड्याना कोणतीही हानी पोहचत नाही. कोमट किंवा गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य, पचनक्रिया सुधारते.
काळीमीरीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काळीमिरी खाल्यामुळे पोटात जमा झालेले जंतू किंवा विषाणू बाहेर पडून जातात. पचनक्रिया निरोगी राहण्यासाठी तुम्ही काळीमिरी आणि मधाचे सेवन करू शकता. यामुळे उलट्या किंवा जुलाबाची समस्या उद्भवणार नाही. शरीर कायमच हेल्दी राहील.
योगासने करण्याआधी अंघोळ करावी की नंतर? जाणून घ्या प्रेमानंद महाराजांनी दिलेला मोलाचा सल्ला
वर्षाच्या बाराही महिने लोक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. पण या दिवसांमध्ये सत्तू किंवा पालकचे सेवन करू नये. या दिवसांमध्ये पालेभाज्या खाणे टाळावे. कारण पालेभाज्या पिकवण्यासाठी किंवा धुवण्यासाठी घाणीच्या पाण्याचा वापर केला जातो. हे पाणी पोटात गेल्यानंतर उलट्या, जुलाब किंवा अन्नातून विषबाधा होऊ शकते.