डोके दुखीमुळे त्रस्त आहात? 'हे' घरगुती उपाय करून तात्काळ मिळवा आराम
वातावरणात होणारे बदल किंवा कामाच्या वाढलेल्या तणावामुळे बऱ्याचदा डोकं दुखू लागतं. याशिवाय काहींना मायग्रेनची समस्या सुद्धा उद्भवते. आहारात होणारे बदल, बिघडलेली पचनक्रिया, सर्दी किंवा डोळ्यांवर आलेल्या तणावामुळे डोके दुखीची समस्या आणखीनच तीव्र होत जाते. घरातील कोणाचेही डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर मेडिकलमधून पेनकिलरच्या गोळ्या आणून खाल्ल्या जातात. मात्र नेहमीच पेनकिलरच्या गोळ्या खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. सतत पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते. पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे तेवढ्या पुरता आराम मिळतो, मात्र पुन्हा एकदा डोकं दुखण्यास सुरुवात होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोके दुखीच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
डोकं दुखायला सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक चहाचे सेवन करतात. मात्र दुधाच्या चहाचे सेवन केल्यामुळे डोके दुखी वाढून शरीरात अपचनाची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे डोके दुखीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आलं मधाच्या चहाचे सेवन करावे. आल्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. याशिवाय आलं मधाचा चहा प्यायल्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होते, वेदनांपासून तात्काळ आराम मिळतो. मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित मध आल्याच्या चहाचे सेवन करावे.
पुदिन्याची पाने अतिशय थंड असतात. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पुदिन्याच्या पानांचे सेवन केले जाते. डोके दुखीची समस्या उद्भवू लागल्यास कपाळावर पुदिन्याचे तेल लावावे. यामध्ये असलेले मेन्थॉल डोक्याच्या रक्तवाहिन्या सैल करण्यास मदत करतात. तसेच तीव्र डोकेदुखीपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या तेलाचा वापर करा. याशिवाय हलक्या हाताने तुम्ही डोकं मालिश सुद्धा करू शकता.
लिंबाच्या सालीमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म शरीर, त्वचा आणि केसांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. कोणत्याही कारणांमुळे डोके दुखीची समस्या उद्भवू लागल्यास लिंबाची साल पाण्यात टाकून गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यानंतर या पाण्याची वाफ घेतल्यास डोके दुखीची समस्या कमी होईल. लिंबाच्या सालीची वाफ घेतल्यास स्नायूंना आराम मिळेल आणि बंद झालेले नाक पुन्हा उघडण्यास मदत होईल.
सकाळी उठल्यानंतर तोंड धुवण्याआधी करा ‘या’ आयुर्वेदिक पानाचे सेवन, शरीरातील जुनाट आजार होतील गायब
पाणी शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. पाण्यात असलेले गुणधर्म शरीर कायम निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी मदत करते. पण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीर डिहायड्रेट झाल्यानंतर डोके दुखीची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे डिहायड्रेशची समस्या उद्भवल्यास भरपूर पाणी प्यावे, नारळ पाणी, लिंबू पाण्याचे सेवन करावे.