दाढीतील केसांमुळे उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार
सर्वच पुरुषांना दाढी वाढवायला खूप आवडते. काही वर्षांआधील क्लीन-शेव्हन चॉकलेट बॉय लूक खूप प्रसिद्ध होता. सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी पुरुष वेगवेगळ्या प्रकारे दाढी कट करून सुंदर लुक करतात. मात्र पुरुषांच्या दाढीमध्ये असंख्य बॅक्टेरिया लपलेल्या असतात. सर्वच पुरुष सुंदर दिसण्यासाठी दाढी वाढवतात. पण दाढी वाढवल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दाढी वाढवल्यामुळे शरीराला कोणत्या गंभीर आजारांची लागण होऊ शकते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पुरुषांची आवडती दाढी आरोग्याचा शत्रू बनवू शकते.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळी उठल्यानंतर तोंड धुवण्याआधी करा ‘या’ आयुर्वेदिक पानाचे सेवन, शरीरातील जुनाट आजार होतील गायब
पुरुषांच्या दाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर बॅक्टरीया आढळून येतात. हे बऱ्याच पुरुषांना माहित नसेल. कामानिमित्त ऑफिसला बाहेर जाताना किंवा धूळ माती, प्रदूषणामुळे महिलांसह पुरुषांच्या त्वचेवर घाण साचून राहते. त्वचेवरील घाण फेसवॉश लावून स्वच्छ केली जाते, मात्र दाढीच्या आतील त्वचा स्वच्छ होत नाही. म्हणूनच डॉक्टरसुद्धा दिवसभरातून दोन ते तीन वेळा त्वचा करण्याचा सल्ला देतात. पण दाढीमधील त्वचा स्वच्छ योग्यरीत्या स्वच्छ होत नाही. यामध्ये आणखीनच बॅक्टेरिया वाढू लागतात. त्वचेमध्ये वाढलेल्या हानिकारक बॅक्टेरिया संपूर्ण त्वचेचे नुकसान करतात.
पुरुषांसह महिलांच्या त्वचेवर बॅक्टेरिया असणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण यामुळे दाढीमध्ये बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात. दाढीच्या स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास त्वचेवर नुकसान होऊ शकते. काही महिन्यांआधी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार 18 ते 76 वयोगटातील पुरुषांच्या दाढीचे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये काढण्यात आलेल्या निकषानुसार पुरुषांच्या दाढीमध्ये टॉयलेट सीटइतके बॅक्टेरिया असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या प्राध्यापक किम्बर्ली डेव्हिस यांनी सांगितल्यानुसार, रुग्णालयात काम करणाऱ्या पुरुषांच्या दाढीमध्ये बॅक्टेरिया असण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय या अभ्यासात असे देखील दिसून आले आहे की मास्क घातलेला असूनसुद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दाढीमध्ये भरपूर बॅक्टरीया आढळून येतात. त्यामुळे मास्क घातल्यानंतर त्याला सतत हात लावू नये.
पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी करेल ‘हे’ बारीक दाण्यांचे जादुई पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन
दाढी किंवा मिशी ठेवलेल्या पुरुषांनी त्वचेची जास्त काळजी घ्यावी. उन्हाळ्यासह पावसाळ्यात सुद्धा पुरुषांच्या त्वचेवर मोठ्या प्रमाणात बॅक्टरीया वाढू लागतात. घाम आल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर दाढी लगेच कोरडी करून घ्यावी. याशिवाय आहारात तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास दाढी स्वच्छ करणे आवश्यक आहे. दाढी स्वच्छ न केल्यास त्वचेवर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची जास्त शक्यता असते.