उन्हाळ्यात आवडीने प्यायला जाणारा ऊसाचा रस आरोग्यासाठी ठरेल घातक
देशभरात सगळीकडे उन्हाचा कडाका वाढला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरील सूर्याच्या अतिनील सूर्यकिरणांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. या दिवसांमध्ये त्वचेसोबत आरोग्याचीसुद्धा जास्त काळजी घ्यावी. उन्हाळा वाढल्यानंतर सर्वच घरांमध्ये नेहमी ताक, लस्सी, कोल्ड्रिंक किंवा इतर पेयांचे सेवन केले जाते. यासोबतच उन्हाळयात आवडीने प्यायले जाणारे पेय म्हणजे ऊसाचा रस. ऊसाचा रस प्यायमुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ऊसाच्या रसाचे सेवन केले जाते. मात्र काहींना नेहमीच ऊसाचा रस पिण्याची सवय असते. पण सतत ऊसाचा रस पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऊसाच्या रसाचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवतात, याबद्दल जाणून घ्या सविस्तर.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊसाचा रस आवडीने प्यायला जातो. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, पोटॅशिअम, मिनरल्सचे प्रमाण अधिक असते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ऊसाचा रस पिण्यास खूप जास्त आवडतो. एक ग्लास ऊसाच्या रसात २५० कॅलरीज आणि 100 ग्रॅम शुगर आढळून येते. त्यामुळे दिवसातून एक किंवा दोन ग्लास ऊसाचा रस प्यावा. त्यापेक्षा जास्त ऊसाचा रस पिऊ नये. यामुळे शरीराचे वजन वाढू शकते.
ऊसाच्या रसात अधिक प्रमाणात साखर आढळून येते. याशिवाय उसाच्या रसात असलेला गोडवा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायद्याचा नाही. तसेच ऊसाच्या रसात ग्लायसेमिक इंडेक्स कमी प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे पातळी झपाट्याने वाढत जाते. शरीरात वाढलेला मधुमेह हदय, मूत्रपिंड, डोळे आणि रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम करतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी ऊसाचा रस जास्त पिऊ नये.
ऊसाच्या रसाचे अतिसेवन केल्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होते. त्वचेवर पिंपल्स येणे, चेहरा काळा पडणे याशिवाय त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. या रसाच्या सेवनामुळे त्वचा अतिशय वृद्ध आणि म्हाताऱ्यांसारखी दिसू लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. याशिवाय त्वचेमधील लवचिकता कमी होऊन त्वचा सैल होऊन जाते.
वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? वजन करण्यासाठी फॉलो करून पहा ‘वॉटर वॉक’ ट्रेंड, आरोग्याला होतील फायदे
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ऊसाच्या रसाचे सेवन केल्यामुळे दातांसंबंधित समस्या उद्भवू शकतात. दातांमध्ये गॅप पडणे, दात किडणे किंवा दातांची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय यामधील साखरेच्या अतिप्रमाणामुळे तोंडात बॅक्टेरिया वाढून तोंडाच्या दुर्गंधिमध्ये वाढ होऊ शकते.