जन करण्यासाठी फॉलो करून पहा 'वॉटर वॉक' ट्रेंड
चुकीचा आहार, व्यायामाची कमतरता, पाण्याची कमतरता, शरीरात निर्माण झालेला पोषक घटकांचा अभाव, बिघडलेली पचनक्रिया, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीची दिनचर्या फॉलो केल्यामुळे शरीराचे अचानक वजन वाढू लागते. वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी वाढून अनेक समस्या उद्भवू लागतात. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण चुकीच्या डाएट आणि जीवनशैलीमुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते.(फोटो सौजन्य – iStock)
वजन वाढ झाल्यानंतर अनेक महिला सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचे जेवण जेवणे टाळतात. पण असे केल्यामुळे शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवण करणे टाळण्यापेक्षा कमी कॅलरीज आणि फायबरयुक्त पदार्थांचे आहारात सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर वॉक’ ट्रेंडचा कसा फायदा होतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जिम, योगा आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. पण, जर या प्रयत्नांनंतरही अपेक्षित परिणाम मिळत नसतील, तर वॉटर वॉकची मदत घेता येऊ शकते, असे एका संशोधकांच्या एका पथकाने सुचवले आहे. पाण्यात चालणे हा जलद वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग आहे. दररोज पाण्यात चालल्याने केवळ वजन कमी होण्यास मदत होते असे नाही, तर सांधेदुखी, संधिवात, त्वचेच्या समस्या, समस्यादेखील कमी होतात, असे यात नमूद आहे. पाण्यात चालण्याचे अनेक गोष्टींसाठी फायदे आहे. हे शारीरिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
पाण्यात चालण्यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे हृदयाच्या आरोग्यास लाभ होतो आणि श्वसन व्यवस्थेवरही सकारात्मक प्रभाव पडतो संपूर्ण शरीराचे वर्कआऊटपाणी शरीराला नैसर्गिकपणे प्रतिकार करते, ज्यामुळे पाय, हिप्स, पाठीचे स्नायू आणि शरीराचे इतर स्नायू अधिक सक्रिय होतात. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
पाण्यात चालण्यामुळे जास्त कॅलरी जाळली जातात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय, पाण्यात चालल्याने मानसिक ताण कमी होतो आणि एक प्रकारचा आरामदायक अनुभव मिळतो. पाण्यात चालताना शरीरावरचा ताण कमी होतो, ज्यामुळे मानसिक शांतता मिळवणे सोपे होते. पाणी शरीराच्या लवचिकतेला चालना देते. कारण, पाणी शरीराला मऊपण आणि लवचिकता देते. यामुळे शरीर अधिक लवचिक बनते. पाण्यात चालताना पचनसंस्था उत्तेजित होते. कारण, शरीराच्या हालचालींमुळे पचनक्रिया गतिमान होऊ शकते. पाण्यात चालणे मानसिक स्पष्टता वाढवते आणि एकाग्रतेला चालना देते, जे मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरू शकते.