
Bopegav Ganeshotsav Wai News
Washim News: वाशिम जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करा; पालकमंत्री भरणे यांचे प्रशासनाला निर्देश
यावेळी बोलताना मकरंद पाटील यांनी, “गेल्या २६ वर्षांपासून बोपेगावच्या ग्रामस्थांनी श्रद्धा, एकजूट आणि सामाजिक बांधिलकी जपत ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा पुढे नेली आहे. ही बाब निश्चितच अभिमानाची आहे,” अशी भावना व्यक्त केली.श्री गणरायाच्या चरणी बोपेगावसह सर्व ग्रामस्थांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावातील एकोपा आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होत राहावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अभयसिंह मोहन गायकवाड, उपाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, खजिनदार अनिल रामराव जाधव, सचिव जितेंद्र सोपान जाधव, श्री.अनुपम जाधव, क्षितिज जाधव,गौरव जाधव, अद्वैत जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण बोपेगाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.
पाटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. दादासाहेब सुभेदार मगर यांना पीएच.डी. पदवी प्रदान