
Sumeet Raghavans Luxurious Home_ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सुमीतने काय केलंय, मुंबईत दोन छोटे फ्लॅट एकत्र करून एक मोठं घर बनवलं आहे. त्यामुळे घरात मोकळेपणा वाटतो. गर्दी वाटत नाही. अनेक लोक मोठं घर घेऊन सगळं भरून ठेवतात. महागड्या वस्तू आणतात मात्र सुमीतने तसं केलं नाही. त्याने प्रत्येक कोपऱ्याचा विचार करून घर सजवलं आहे. घरात शिरलं की प्रसन्न वाटतं, शांत वाटतं. कुठेही भपका नाही, दिखावा नाही. फक्त आपुलकी आहे.
साधेपणातच खरी घरात सगळ्यात जास्त काय दिसतं तो त्या घरामधला साधेपणा आहे. भिंतींवर खूप भडक रंग नसून पांढरा, ऑफ व्हाईट असेच शांत रंग लावले. फर्निचर पण अगदी मोजकं आहे. त्यामुळे घर सजवल्यासारखे तसेच खूप मोठं आणि मोकळं वाटतं. प्रत्येक वस्तूला स्वतःची एक जागा असल्याने कुठेही कचरा, गर्दी दिसत नाही. घर सुंदर दिसावं यापेक्षा घरात राहणाऱ्या माणसांचं मन दिसावं, असं त्याने घर सजवलं आहे.
त्याच्या घरात सगळ्यात वेगळी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संविधानासाठी त्यांनी वेगळी जागा बनवलेली आहे. आजकाल लोक घरात टीव्ही, गेम, बार बनवतात. पण सुमीतने आपल्या घरात भारतीय संविधानासाठी एक खास जागा बनवली आहे. तिथे संविधानाची प्रत आणि पुस्तकं ठेवली आहेत. हा फक्त शो नाही, तर त्याच्या विचारांचं प्रतीक आहे. तो संविधानाचा किती आदर करतो, हे यातून दिसतं. घरात असा कोपरा बनवण्याची कल्पना खरंच भारी आहे. घर फक्त सुंदर वस्तूंनी नाही, तर चांगल्या विचारांनी पण सुंदर बनतं, हे त्याने दाखवून दिलं.
घरात सगळीकडे साधे रंग असले तरी मधेच मधेच पिवळ्या रंगाचा वापर केला आहे. एक कुशन, एक दिवा, किंवा एखादी पिवळ्या रंगाची खुर्ची ठेवलेली आहे. त्यामुळे घरात एकदम फ्रेश आणि आनंदी वाटतं. साध्या रंगात पिवळा रंग उठून दिसतो.आणि सगळं फर्निचर लाकडी आहे. लाकडामुळे घराला एक ऊब येते. घर आपलंसं वाटतं. टेबल, कपाट, खुर्च्या सगळं लाकडाचं आणि अगदी साध्या डिझाईनचं.
अभिनेता शशांक केतकरचं घर पाहिलंत का? खिडकीतील छोटंसं तुळशी वृंदावन …
जसा संविधानासाठी कोपरा आहे, तसाच देवासाठी पण एक सुंदर लाकडी देव्हारा आहे. जेवणाच्या जागेजवळच त्याने हा देव्हारा ठेवला आहे.सुमीतने सांगितलं होतं की आमच्या घरात देवाला खूप मान आहे. सगळे सण आम्ही एकत्र साजरे करतो. त्यामुळे हा देव्हारा फक्त सजावट नाही, तर त्याच्या श्रद्धेचा भाग आहे.एकंदरीत सुमीत राघवनचं घर बघितलं की कळतं, घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असावं लागतं. कमी वस्तूंमध्ये पण घर कसं सुंदर आणि विचारांनी भरलेलं ठेवता येतं, याचं हे उत्तम उदाहरण आहे.