Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Health Tips: कडक उन्हाळ्यात वाटेल फ्रेश! ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सांगितलेले ‘हे’ उपाय नक्की करा

वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले उपाय नक्की करून पाहावे. यामुळे कडक उन्हाळ्यात शरीरात थंडावा कायम टिकून राहील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 14, 2026 | 08:35 AM
कडक उन्हाळ्यात वाटेल फ्रेश! ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सांगितलेले 'हे' उपाय नक्की करा

कडक उन्हाळ्यात वाटेल फ्रेश! ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सांगितलेले 'हे' उपाय नक्की करा

Follow Us
Follow Us:

उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाय?
ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेल्या सोप्या टिप्स?
वाढत्या उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?

राज्यासह संपूर्ण देशभरात कडक ऊन पडत आहे. उन्हाळ्याच्या झळा वाढल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि आरोग्य बिघडते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि थकवा, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी.कडक उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे डोकेदुखी, चक्कर तर काहीवेळा हार्ट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. उन्हाचा फटका बसल्यास आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. हीटस्ट्रोक, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि पोटासंबंधी आजारांच्या समस्या निर्माण झाल्यानंतर शरीर कमकुवत होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. हे उपाय केल्यास उष्णतेपासून शरीराला थंडावा मिळेल आणि पचनक्रिया कायमच सुरळीत चालू राहील. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

आई-वडिलांना मधुमेहाचा त्रास? ‘या’ सोप्या सवयींनी साखर राहिल नियंत्रणात, तज्ज्ञांनी दिली सविस्तर माहिती

उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाय:

नारळ पाणी आणि चिया सीड्स:

वाढत्या उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित किंवा आठवड्यातून दोनदा नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाण्याच्या सेवनामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते. ऋजुता यांनी सांगितल्यानुसार, नारळ पाणी कधीही दुपारी १२ वाजण्याच्या आधी प्यावे. नारळ पाण्यासोबतच एक चमचा चिया सीड्स पाण्यात मिक्स करून प्यावेत. यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते. नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशिअम आणि मॅगनीज असल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि हे एक नॅचरल कुलंट आहे, ज्यामुळे तुमचे शरीर कायमच हायड्रेट राहील. नारळ पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते.

दुपारच्या जेवणात ताक किंवा दही खावे:

दुपारच्या जेवणात दही किंवा ताकाचा समावेश करावा. दही, ताक प्यायल्यामुळे पोटात थंडावा कायम टिकून राहतो आणि उष्णता कमी होण्यास मदत होते. दही किंवा ताक पिताना भाजलेल्या जिऱ्याची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दही आणि ताकाचे सेवन करावे.

सायंकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर केळी:

पोटाच्या समस्येवर आराम मिळवण्यासाठी नियमित एक केळ खावे. ऋजुता यांच्या म्हणण्यानुसार, सायंकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक केळ खावे. केळी पोटासाठी फायदेशीर आहे. कारण यामध्ये भरपूर इलेक्ट्रोलाइट्स असतात. केळी खाल्ल्यामुळे पोट स्वच्छ होते आणि पोट हलके होते. आतड्यांमध्ये जमा झालेली चिकट मल बाहेर काढून टाकण्यासाठी केळी खावी.

उन्हात पोटात वाढलेल्या जळजळमुळे आंबट ढेकर येतात? तात्काळ आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

महिलांसाठी महत्वपूर्ण खास टिप्स:

वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. शरीरात होणाऱ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. याशिवाय पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या फेजमध्ये शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे पचनक्रिया स्लो होऊन पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे महिलांनी आहारात सहज पचन होणाऱ्या आणि शरीरास पौष्टिक ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: दिवसभरात भरपूर पाणी, ताक, नारळ पाणी, लिंबू सरबत, आणि फळांचा रस प्या. तहान लागण्याची वाट न पाहता पाणी पित राहा.

  • Que: उन्हाळ्यात काय खावे आणि काय टाळावे?

    Ans: काकडी, टरबूज, खरबूज, संत्री यांसारखी रसाळ फळे खा. दही आणि ताकाचा आहारात समावेश करा. तेलकट, मसालेदार आणि शिळे अन्न टाळा, कारण यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात.

  • Que: उन्हाळ्यात आरोग्यासाठी कोणती विशेष काळजी घ्यावी?

    Ans: कडक उन्हातून आल्यावर लगेच एसीमध्ये जाऊ नका किंवा थंड पाणी पिऊ नका, थोडा वेळ थांबा. डोळ्यांची आणि त्वचेची जळजळ टाळण्यासाठी गुलाब पाणी वापरा.

Web Title: Summer care tips rujuta divekar recommended these measures to protect against heat should be followed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • rujuta diwekar
  • summer care tips
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.