Masala Tak Recipe : उन्हाळ्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून अशा वातावरणात थंडगार पेयाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरु शकते. तुम्ही या दिवसांत मसाला ताक तयार करुन पिऊ शकता.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मसाला ताक हे उन्हाळ्यात बनवलं जाणारं एक लोकप्रिय ड्रिंक आहे.
याचे सेवन शरीराला आतून थंडावा मिळवून देते.
आज आपण या लेखात मसाला ताक बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे, पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आणि हलके-फुलके पेय म्हणजे मसाला ताक. महाराष्ट्रात जेवणानंतर ताक पिण्याची परंपरा आहे आणि त्यात मसाल्यांचा खास तडका दिला की त्याची चव आणखी खुलते. बाजारात मिळणाऱ्या पेयांपेक्षा घरचे मसाला ताक अधिक पौष्टिक आणि सुरक्षित असते. यात वापरले जाणारे जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आलं यांसारखे घटक केवळ चव वाढवत नाहीत, तर पचनक्रियेलाही मदत करतात. गरम हवामानात शरीरातील उष्णता कमी करून ताजेतवाने वाटण्यासाठी मसाला ताक हा उत्तम पर्याय आहे. शिवाय हे बनवायला अतिशय सोपे असून काही मिनिटांत तयार होते. चला मसाला ताक बनवण्याची रेसिपीनोट करून घेऊयात.