Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा एकदा होईल चमकदार! त्वचेवर लावा Coconut Face Pack, टॅनिंग होईल गायब

उन्हाळ्यात चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि त्वचेच्या इतर सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या दुधाचा वापर करून तयार केलेला फेसपॅक लावावा. चला तर जाणून घेऊया फेसपॅक बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 08, 2026 | 09:53 AM
उन्हाळामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा एकदा होईल चमकदार! त्वचेवर लावा Coconut Face Pack, टॅनिंग होईल गायब

उन्हाळामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा एकदा होईल चमकदार! त्वचेवर लावा Coconut Face Pack, टॅनिंग होईल गायब

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचा खूप जास्त टॅन झाल्यासारखे वाटते. चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग, डेड स्किनचे थर, पिंपल्स आणि ऍक्ने त्वचेचे गंभीर नुकसान करतात. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर चेहरा निस्तेज होऊन जातो. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. फेसपॅक, फेसमास्क, स्क्रब तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन कोरियन ट्रीटमेंट आणि महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. हजारो रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावरील ग्लो जास्त वेळ टिकून राहत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात आणि चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया कोकोनट फेस पॅक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा नॅचरल नाईट सीरम, पिग्मेंटेशन-सुरकुत्या १५ दिवसांमध्ये होतील कायमच्या गायब

फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ओल्या खोबऱ्याचे दूध
  • मध
  • बेसन
  • हळद
  • लिंबाचा रस
ओल्या खोबऱ्याचा वापर करून फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये नारळाचे दूध घेऊन त्यात बेसन, चिमूटभर हळद, मध आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याच्या ओल्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यासोबतच चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. त्यानंतर फेसपॅक १० ते १५ मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि त्वचा अतिशय सुंदर दिसेल.

अचानक मोठ्या प्रमाणावर केस गळती वाढली आहे? आरोग्यासंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत

आठवडाभरात चेहऱ्यावर चमकदार ग्लो हवा असेल तर खोबऱ्याच्या दुधापासून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचेवरील ग्लो वाढण्यास मदत होईल. पार्लरसारखा चमकदार ग्लो चेहऱ्यावर वाढवण्यासाठी खोबऱ्याच्या दुधाचा वापर करावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वाढलेले ओपन पोर्स भरण्यास मदत होईल. तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि बारीक रेषा नष्ट करण्यासाठी खोबऱ्याचा फेसपॅक अतिशय फायदेशीर ठरेल. नारळाचे दूध आणि मध त्वचेचा काळवंडलेला रंग सुधारण्यास मदत करेल. नारळामध्ये फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Summer tanned skin will be glowing once again apply coconut face pack on the skin tanning will disappear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
1

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
2

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
3

कोंड्यामुळे टाळूवर चिकटपणा वाढला आहे? मग एक चमचा मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी नियमित करा ‘या’ हर्बल पेयांचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
4

केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी नियमित करा ‘या’ हर्बल पेयांचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.