Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर, केसांची होईल वाढ

Hair Care Tips: केस गळणे, टाळूवर वाढलेला कोंडा इत्यादी सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आवळा, रिठा, जास्वंदाचे फुल, शिकेकाई इत्यादी पदार्थांचा वापर करून तयार केलेली पावडर वापरावी. यामुळे केस गळणे कमी होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 14, 2026 | 02:36 PM
सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर

सतत गळणाऱ्या केसांमुळे वैतागला आहात? मग 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा आयुर्वेदिक पावडर

Follow Us
Follow Us:

Hair Care Tips: केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे या समस्या अतिशय सामान्य झाल्या आहेत. महिलांसह पुरुषांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर केस गळतात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे किंवा टाळूवर इन्फेक्शन वाढल्यानंतर केसांच्या समस्या वाढू लागतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअरचा वापर केला जातो. तर काहीवेळा केस अतिशय स्मूथ आणि चमकदार दिसावे, यासाठी वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट केल्या जातात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर वारंवार शाम्पू बदलण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही केस गळणे थाबंवण्यासाठी आयुर्वेदिक पावडर कशा पद्धतीने बनवावी, चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा

केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय:

आयुर्वेदिक पावडर तयार करण्यासाठी मोठ्या भांड्यात आवळा, जास्वंदाचे फुल, शिकेकाई, मेथी दाणे, भृंगराज पावडर एकसमान घ्या. त्यानंतर त्यात रिठा पावडर घालून पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेली पावडर केस धुवण्याच्या आधल्या रात्री वाटीमध्ये घेऊन त्यात गरम पाणी घाला आणि पेस्ट तयार करून घ्या. रात्रभर तयार केलेली पेस्ट तशीच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी केस धुवण्याच्या आधी तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर अर्धा तास ठेवून पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

रीठाचा वापर केल्यामुळे केसांना हलकासा फेस येईल आणि टाळू स्वच्छ होण्यास मदत होईल. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास केसांच्या समस्या कमी होईल. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतात. केसांच्या वाढीसाठी वारंवार कोणत्याही महागड्या हेअर केअरचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. सतत येणाऱ्या घामामुळे केसांमध्ये कोंडा वाढू लागतो. केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे टाळूवर खूप जास्त खाज येते आणि केस गळण्यास सुरुवात होते.

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका

आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक केसांच्या मुळांना पोषण देतात आणि टाळूवर जमा झालेला चिकटपणा कमी करण्यास मदत करतात. रिठाचा वापर केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. केस धुवताना रिठा वापरल्यास मुळांसहित केस स्वच्छ होतात आणि केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम दिसून येतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: केसगळती कमी करण्यासाठी घरच्या घरी आयुर्वेदिक पावडर कशी बनवावी?

    Ans: आवळा, शिकेकाई, रिठा आणि भृंगराज यांसारख्या वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर करून केसांसाठी पावडर तयार करता येते.

  • Que: आवळा पावडर केसांसाठी फायदेशीर आहे का?

    Ans: आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. केसांची निगा राखण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. मात्र, आवळा पावडरमुळे केसगळती थांबते किंवा नवीन केस उगवतात, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.

  • Que: शिकेकाई आणि रिठा केसांसाठी कसे उपयोगी ठरतात?

    Ans: शिकेकाई आणि रिठा यांचा वापर पारंपरिक नैसर्गिक केस स्वच्छ करण्यासाठी केला जातो. ते केसांवरील तेल आणि घाण काढण्यास मदत करू शकतात. मात्र, संवेदनशील त्वचेला त्यांचा त्रास होऊ शकतो.

Web Title: Hair care tips are you frustrated with constant hair fall then make an ayurvedic powder at home using these ingredients sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • amla benefits
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा
1

Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका
2

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
3

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Benefits Of Amla Powder: केसांपासून त्वचेपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आवळ्याची पावडर! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
4

Benefits Of Amla Powder: केसांपासून त्वचेपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आवळ्याची पावडर! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.