Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunday Special : घरी बनवा टेस्टी, मसालेदार ‘रावस फ्राय’, काही मिनिटांत तयार होते रेसिपी

Ravas Fry Recipe : रविवार स्पेशल जर घरी मासांहारचा प्लॅन बनत असेल तर ही रेसिपी घरी बनवायलाच हवी. चिकन, मटण नको यंदा घरी बनवा टेस्टी आणि मसालेदार रावस फ्राय.

  • By नुपूर भगत
Updated On: May 10, 2026 | 10:02 AM
Sunday Special : घरी बनवा टेस्टी, मसालेदार 'रावस फ्राय', काही मिनिटांत तयार होते रेसिपी

Sunday Special : घरी बनवा टेस्टी, मसालेदार 'रावस फ्राय', काही मिनिटांत तयार होते रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • मासेप्रेमींसाठी आजची रेसिपी खास ठरणार आहे.
  • आज आम्ही शेअर करयोय रावस फ्रायची मजेदार रेसिपी.
  • रावस हा माशाचा एक प्रकार आहे.
समुद्रकिनाऱ्याच्या भागात मासे खाण्याची परंपरा खूप जुनी आहे आणि त्यामध्ये रावस मासा विशेष लोकप्रिय मानला जातो. रावसचा मऊसर पोत, हलका गोडसर स्वाद आणि कमी काटे यामुळे हा मासा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. मसालेदार फिश फ्राय म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असा रावस फिश फ्राय हा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या खास मेनूसाठी उत्तम पर्याय ठरतो.

Recipe : बाजारासारखा कुरकुरीत गुजराती ‘फाफडा’ बनवा घरच्या घरी, अनेक दिवस साठवून ठेवता येईल हा हटके स्नॅक

ही रेसिपी बनवण्यासाठी फार जास्त साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असणारे मसाले वापरून तुम्ही अगदी हॉटेलसारखा चविष्ट फिश फ्राय तयार करू शकता. लिंबाचा हलका आंबटपणा, आलं-लसूण पेस्टचा सुगंध आणि तिखट मसाल्यांचा परफेक्ट समतोल यामुळे प्रत्येक घास अधिकच स्वादिष्ट लागतो. कोकम सरबत, कांदा आणि भाकरीसोबत हा फिश फ्राय अप्रतिम लागतो. चला जाणून घेऊया याची रेसिपी.

साहित्य

  • ४ ते ५ रावस माशाचे तुकडे
  • २ चमचे लाल तिखट
  • १ चमचा हळद
  • १ चमचा गरम मसाला
  • १ मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट
  • १ चमचा लिंबाचा रस
  • चवीपुरते मीठ
  • २ चमचे तांदळाचे पीठ
  • २ चमचे रवा
  • तेल तळण्यासाठी
ऊसाचा रस प्यायला अजिबात आवडत नाही? मग कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम रावस माशाचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या. अतिरिक्त पाणी निथळून मासे एका भांड्यात ठेवा.
  • एका बाऊलमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र मिसळा.
  • तयार मसाला माशांच्या तुकड्यांना व्यवस्थित लावा. प्रत्येक तुकड्यावर मसाला चांगला मुरला पाहिजे. हे मासे किमान ३० मिनिटे झाकून ठेवा.
  • एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ आणि रवा मिसळून घ्या. मुरवलेले मासे या मिश्रणात हलकेच घोळवा.
  • कढईमध्ये तेल गरम करा. तेल मध्यम आचेवर गरम झाल्यावर माशाचे तुकडे सावधपणे सोडा.
  • दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मासे तळून घ्या.
  • तयार रावस फिश फ्राय गरमागरम कांदा, लिंबाच्या फोडी आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Sunday special make tasty and traditional ravas rava fry at home note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Fish market
  • marathi recipe

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
2

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.