या वर्षातलं सगळ्यात पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आज सुरु झालं आहे. आज वैशाख अमावस्याही आहे. सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सूतक लागतं. आजचं सूर्यग्रहण (Solar Eclipse 2023) कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. याची खासियत अशी की एकाच दिवसात तीन प्रकारचं सूर्यग्रहण पाहायला मिळेल. वैज्ञानिकांनी या सूर्यग्रहणाला हायब्रीड सूर्यग्रहण म्हटलं आहे. यात आंशिक, पूर्ण आणि कुंडलाकार सूर्यग्रहण याचा समावेश आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणाला अशुभ घटना मानलं जातं. त्यामुळे ग्रहण काळात पूजा आणि शुभ कार्य वर्ज्य आहेत. असं मानलं जातं की ग्रहणाच्या काळात सूर्य पीडित होतो त्यामुळे त्याच्यातील शुभता कमी होते. या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली आहे. (Suryagrahan News)
[read_also content=”सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार का? राज्यपालांचा निर्णय मागे घेणार? काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर? https://www.navarashtra.com/maharashtra/will-sixteen-mla-including-chief-minister-eknath-shinde-be-disqualified-in-the-supreme-court-will-the-governors-decision-be-withdrawn-what-did-prakash-ambedkar-say-387682.html”]
भारतात हे सूर्यग्रहण दिसत नाहीये. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली आहे. या सूर्यग्रहणामळ्ये सूर्य, चंद्र , राहू आणि बुधाचा संयोग होत आहे. तसेच शनिची दृष्टी या ग्रहणावर आहे. सूर्य आणि शनीच्या प्रभावामुळे आगामी काळात अपघात होण्याची शक्यता आहे.राजकीयदृष्ट्या मोठ्या हालचाली घडू शकतात.शेअर बाजार आणि जागतिक आर्थिक स्थिती बदलू शकते. रोग वाढतील. मात्र औषधांनी तुम्ही ते नियंत्रित करू शकता.मेष आणि तुळ राशीचा प्रभाव जगात युद्धाचे संकेत देणारा आहे.
सूर्यग्रहणाची वेळ
हे ग्रहण सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु झालं आहे. दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी हे संपलं आहे. या ग्रहणाचा अवधी 5 तास 24 मिनिटे आहे. भारतात हे ग्रहण दिसत नसल्याने सूतक पाळण्याची गरज नाही. चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर सावली पडते तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हटलं जातं. या अवस्थेत चंद्र सूर्यप्रकाश काही अंशी किंवा पूर्णपणे झाकतो. कंकणाकृती सूर्यग्रहणामध्ये ग्रहण एका कुंडलाकार सूर्यग्रहणाच्या रुपात सुरु होतं. नंतर हळूहळू ते पूर्ण सूर्यग्रहणामध्ये बदलतं. पुन्हा कुंडलाकार सूर्यग्रहणाच्या रुपात ते बदलतं.
हे सूर्यग्रहण कंबोडिया, चीन, अमेरिका, मायक्रोनेशिया, मलेशिया, फिजी, जपान, सामोआ, सोलोमन, बरुनी, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ, इंडोनेशिया, फिलीपिन्स, दक्षिण हिंद महासागर, व्हिएतनाम आणि तैवान या देशातून दिसणार आहे.
सूर्यग्रहणात काय करावे आणि काय करू नये?