पोलादपूर तालुक्यातील रानवडी गावच्या पाटीलवाडीत गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू असलेली “एक वाडी एक गणपती, एक वाडी एक गौराई” ही परंपरा आजही कायम आहे. साधारण २५ कुटुंबे मुंबई-पुण्यासह विविध ठिकाणी वास्तव्यास असली तरी गणेशोत्सव काळात सर्वजण गावी येऊन श्री उतेश्वर मंदिरात सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना करतात. उत्सव काळात भजन, कीर्तन, पारंपरिक खेळ आणि सामूहिक जेवणामुळे गावात ऐक्य, आपुलकी आणि सणासुदीचे वातावरण निर्माण होते. ही प्रथा सर्वांसाठी आदर्श ठरत असून तरुण पिढीही ती पुढे चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत आहे.