Asia Cup 2025 : ९ तारखेपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कपचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. यावेळी आशिया कप टी२० स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. भारतीय संघ १० सप्टेंबरपासून यूएईविरुद्ध पहिला सामना खेळून मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर मैदानात पाय ठेवणार आहे.आयपीएलमध्ये त्याने शानदार कामगिरी करून अनेक विक्रम रचले होते. त्याचप्रमाणे आता सूर्यकुमार यादवला आशिया कपमध्ये अनेक विक्रम करण्याची संधी असणार आहे.(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup 2025: Suryakumar Yadav gets a great chance to set a record in the Asia Cup! Dhobi will give a go to these players
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशिया कप स्पर्धेसाठी 4 सप्टेंबरला युएईला रवाना होणार आहे. भारत पहिला सामना 10 ऑक्टोबरला युएईविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादवकडे विक्रम रचण्याची नामी संधी असणार आहे. या स्पर्धेत तो एकूण सात खेळाडूंना पिछाडीवर टाकू शकतो.
आशिया कप टी20 स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत अव्वलस्थान पटकवण्याची संधी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. यासाठी त्याला केवळ 6 षटकारांची गरज आहे. त्यामुळे साखळी फेरीतील तीन सामन्यातच हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
अफगाणिस्तानचा फलंदाज नजीबुल्लाह झद्रानकडून पुरुषांच्या टी20 आशिया कपमध्ये सर्वाधिक 13 षटकार मारण्याचा विक्रम आहे. रोहित शर्माने 9 सामन्यांमध्ये 12 षटकार, तर विराट कोहलीने 10 सामन्यांमध्ये 11 षटकार खेचले आहेत. सूर्यकुमार यादव 8 षटकार मारून तो यादित 8 व्या स्थानी आहे.
सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये केवळ फक्त 6 षटकार मारताचा तो पहिल्या स्थानी येणार आहे. पण रहमानउल्लाह गुरबाजचं त्याच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण तो 12 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी आशिया कप ही स्पर्धा खूप महत्त्वाची असणार आहे. त्याचे कारण म्हणजे ही स्पर्धा टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधीची सराव परीक्षा असणार आहे. आयपीएलमध्ये सूर्याने जबरदस्त कामगिरी केली होती आता तेच्याकडून त्याच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.