अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले. जातीजातीत संघर्ष वाढविण्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तामिळनाडू प्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शरद पवार यांची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगून, काही लोक मुद्दाम आंदोलनात मिठाचा खडा टाकत असल्याची टीकाही त्यांनी केली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अहिल्यानगर शहरात उपस्थित असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.