आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवल्याने शरीराला होतात असंख्य फायदे
शरीर स्वच्छ करण्यासाठी नेहमीच अंघोळ केली जाते. अंघोळ केल्यामुळे शरीरासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामामुळे शरीरावरील त्वचा तेलकट किंवा चिकट होऊन जाते. त्वचा तेलकट झाल्यानंतर शरीरावर घामाचा थर तसाच साचून राहतो. ज्यामुळे त्वचेवर इन्फेक्शन होणे, त्वचा लाल होणे, त्वचेवर रॅश येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तुरटी शरीरावरील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करते. बऱ्याचदा घरात तुम्ही पाहिलं असेल, दाढी केल्यानंतर त्वचेवर तुरटी फिरवली जाते. पण असे नसून तुरटीचा वापर इतरही अनेक कारंणासाठी केला जातो. अंघोळ करताना पाण्यात तुरटी फिरवल्यास शरीराला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुरटी फिरवल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेवर घाम येतो. सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेवर इन्फेक्शन, रॅश किंवा दुर्गंधी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात नेहमी तुरटी फिरवावी. याशिवाय मीठ टाकल्यास सुद्धा शरीरात असंख्य बदल दिसून येतील. यामध्ये असलेले नॅचरल अॅंटी-सेप्टिक गुणधर्म त्वचा स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. घामाच्या दुर्गंधीपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा.
शरीरात होणारे हार्मोनल बदल, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरळ येणे किंवा इतर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी तुरटीचा फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावावा. यामुळे चेहरा स्वच्छ आणि उजळदार दिसतो. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी तुरटी प्रभावी ठरते.
वाढत्या वयात सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी तुरटीच्या पाण्याने अंघोळ करावी. तुरटीच्या पाण्याने अंघोळ केल्यास हाडांमधील वेदना कमी होतात आणि तात्काळ आराम मिळतो. चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होतात. याशिवाय तुरटीच्या पाण्याने हाडे शेकवल्यास हाडांमधील वेदना कमी होतील.
केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि टाळूवरील इन्फेक्शन कमी करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. तुरटीमध्ये असलेले गुणधर्म टाळू स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यासाठी अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी जाणीव अंघोळ करावी. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होऊन डोक्यातील उवा सुद्धा कमी होण्यास मदत होईल.