गुडघ्यांवरील काळेपणामुळे त्रस्त आहात? २ रुपयांच्या 'या' पदार्थाचा वापर करून त्वचा करा उजळदार
सर्वच महिलांना संपूर्ण हातापायांची त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार हवी असते. मात्र बऱ्याचदा त्वचेच्या आरोग्याकडे जास्त लक्ष दिले जाते. पण असे न करताना हात आणि पायांच्या त्वचेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सतत येणाऱ्या घामामुळे किंवा शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हातापायांवरील त्वचा अतिशय काळी होऊन जाते. त्यामुळे हातापायांच्या त्वचेकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण शरीराकडे व्यवस्थित लक्षणे देणे गरजेचे आहे. हातांचे कोपरे किंवा पायांचे गुडघे काळे झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र केमिकलयुक्त क्रीमचा वापर केला जातो. केमिकलयुक्त प्रॉडक्ट वारंवार लावल्यामुळे त्वचा अतिशय काळी होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
बाहेर फिरायला जाताना लहान किंवा तोकडे कपडे घातल्यानंतर हातापायांची त्वचा काळी आणि निस्तेज दिसू लागते. गुडघ्यांवर वाढलेला काळेपणा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकतो. अंघोळ करताना कितीही त्वचा स्वच्छ केली तरीसुद्धा त्वचा काळी दिसू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हात आणि गुडघ्यांवर वाढलेला काळेपणा दूर करण्यासाठी कॉफीचा कसा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. कॉफी मास्क लावल्यामुळे हातापायांचा काळेपणा दूर होईल आणि त्वचा उजळदार दिसेल.
हातापायांवर वाढलेला काळेपणा घालवण्यासाठी कॉफी पावडरचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा उजळदार करण्यासाठी मदत करतात. याशिवाय कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचा चमकदार करतात. शरीरावर साचून राहिलेली डेड स्किन घालवण्यासाठी कॉफी मास्कचा वापर करावा. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. तसेच तुम्ही कॉफी मास्कचा वापर त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी सुद्धा करू शकता.
कॉफी मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात शॅम्पू घालून मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार केलेला मास्क गुडघ्यांवर लावून लिंबाच्या सालीने हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा मास्क आठवड्यातून दोनदा लावल्यास त्वचा अतिशय चमकदार होईल.