त्वचेवरील हरवलेलं तारुण्य पुन्हा परत मिळवण्यासाठी घरीच बनवा गाजरचे मॉइश्चयराझर
शरीरात वाढलेल्या मानसिक तणावाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्वचा आणि केसांसंबधीत अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात वाढलेला तणाव कमी करून आनंदी जीवन जगणे आवश्यक आहे. बऱ्याचदा तणावामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेवर पिंपल्स आणि मुरुमांचे डाग येऊ लागतात. त्वचेवर आलेले पिंपल्स आणि डाग घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात. यासोबतच वेगवेगळे फेसपॅक, फेसमास्क किंवा इतर अनेक गोष्टी लावल्या जातात. मात्र यामुळे त्वचा सुंदर आणि देखणी होण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते. त्वचेला सूट न होणारे प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा आणखीनच खराब होऊन जातो.(फोटो सौजन्य – iStock)
वाढत्या वयात महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे महिला दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे शरीरासह त्वचेसुद्धा हानी होते. चेहऱ्यावर आलेले वांग, पिगमेंटेशन किंवा इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र असे न करता घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावी. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. याशिवाय चेहरा अतिशय सुंदर आणि उजळदार दिसतो. त्वचा मऊ आणि सुंदर राहण्यासाठी दिवसभरातून दोन वेळा मॉइश्चरायझरचा वापर चेहऱ्यावर करावा.
गाजर खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. गाजरामध्ये असलेले गुणधर्म शरीर आतून स्वच्छ करते. याशिवाय शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी गाजरचे सेवन करावे. विटामिन ए, सी आणि ई, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे त्वचेवर वाढलेले डाग कमी होऊन त्वचा सुंदर आणि चमकदार दिसू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेची चमक वाढवण्यासाठी गाजरचे मॉइश्चरायझर कसे बनवावे, याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
गाजरचे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. त्यानंतर गाजर किसून घ्या. मिक्सरच्या भांड्यात किसलेलं गाजर आणि गुलाब पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट गाळून घ्या. वाटीमध्ये गाजरचा रस घेऊन त्यात चमचाभर कोरफड जेल घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात विटामिन ई कँप्सूल घाला. यामुळे त्वचा उजळदार होईल. तयार केलेले मॉइश्चरायझर छोट्या काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास आठवडाभर व्यवस्थित राहील. रात्री झोपताना गाजरचे मॉइश्चरायझर नियमित चेहऱ्यावर लावून झोपल्यास आठवड्याभरात फरक दिसून येईल.