डिजिटल युगात वाढतोय Cervical Pain चा धोका!
कोरोनानंतरच्या काळात जीवनशैलीमध्ये अनेक बदल झाले आहेत. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर सुद्धा लागलेच दिसून येतो. कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, सतत जंक फूडचे सेवन, सतत मोबाईल किंवा लॅपटॉपवरील वाढलेला काम, मानसिक आणि शारीरिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मात्र हल्ली बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेक तरुणांमध्ये सर्व्हायकल पेनचा धोका वाढू लागला आहे. दैनंदिन वापरात सतत डिजिटल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे मान दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे, डोकं दुखणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात.सर्व्हायकल पेनची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात घामामुळे शरीराची आग होते? मग शांत आणि आरामदायी झोपेसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
सर्व्हायकल पेनची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर मानेच्या भोवती तीव्र वेदना होऊ लागतात. या वेदना हळूहळू वाढू लागतात. आधिकवेल लॅपटॉप किंवा मोबाईल घेऊन बसल्यामुळे मानेभोवती वेदना होऊ लागतात. मान न हलवल्यामुळे मानेभोवती कडकपणा येतो आणि मान हलत नाही. पण सुरवातीच्या दिवसांमध्ये सामान्य वाटणाऱ्या वेदना लवकर बऱ्या होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सर्व्हायकल पेन होण्यास सुरुवात झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात? कोणते उपाय करून आराम मिळवावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सर्व्हायकल पेनची समस्या कमी वयात उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. याशिवाय दिवसभरातून दोन ते तीन वेळा मान 360 डिग्रीमध्ये वाळवावी. रात्रीच्या वेळी झोपताना डोक्याखाली मऊ आणि आरामदायी उशीचा वापर करावा. याशिवाय सरळ पोझिशनमध्ये झोपण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे मानेवर तणाव येणार नाही. तसेच शरीरातील हाडे निरोगी राहण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. दैनंदिन आहारात ड्रायफ्रुटस आणि फळे भाज्यांचे सेवन करावे. बॉडी स्ट्रेचिंग, हातांना स्ट्रेच करणे, मानेला मागे पुढे वाकवणे इत्यादी हालचाली करणे आवश्यक आहे. या हालचाली केल्यामुळे मानेमधील वेदना कमी होतील आराम मिळेल.