तंबाखू किंवा गुटखा खाऊन लाल झालेले दात स्वच्छ करण्यासाठी 'या' फळांच्या सालीचा करा वापर
प्रत्येक व्यक्तीसाठी दातांचे आरोग्य निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण चेहऱ्यावरील स्मितहास्य खुलवण्यासाठी दात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी असणे आवश्यक आहे. दातांचे आरोग्य खराब झाल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने काहींना काही उपचार करून घेतात, मात्र तरीसुद्धा दात स्वच्छ होत नाहीत. याशिवाय अनेकांना गुटखा, तंबाखू इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय असते. या पदार्थांमध्ये असलेले हानिकारक केमिकल दातांसह संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. त्यामुळे गुटखा किंवा इतर कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन करू नये. रोजच्या आहारात गोड पदार्थांचे सेवन, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केले जाते.(फोटो सौजन्य – iStock)
RO चा पाणी सतत पिणे किती फायद्याचे? ‘या’ आजारांची शक्यता
मात्र या पदार्थांचे सेवन केल्यानंतर दात स्वच्छ न केल्यामुळे दातांवर पिवळा थर किंवा पांढरा थर तसाच साचून राहतो, ज्यामुळे दातांचे आरोग्य अतिशय खराब दिसू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तंबाखू किंवा गुटखा खाऊन लाल झालेले दात स्वच्छ करण्यासाठी कोणत्या फळांच्या सालीचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या साली फेकून देण्याऐवजी दात स्वच्छ करण्यासाठी वापर करावा.
आरोग्य आणि त्वचेसाठी संत्र्याचे सेवन करणे अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये असलेले इतर पोषक घटक आरोग्य आणि त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. संत्र्याच्या सालीमध्ये सायट्रिक ऍसिड आढळून येते, ज्यामुळे दातांवर साचून राहिलेला पिवळेपणा कमी होतो आणि दात स्वच्छ होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट घटक दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यासाठी रात्री झोपण्याआधी संत्र्याची साल दातांवर चोळून घ्या. त्यानंतर काहीवेळ संत्र्याच्या सालीने दातांवर मसाज करा. नंतर पाण्याने दात स्वच्छ करून घ्या.
केळ्याच्या सालीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे दातांवरील हरवलेली चमक पुन्हा परत येते. यासाठी केळ्याच्या सालीमधील आतील भाग काढून दातांवर ब्रशने किंवा हाताने घासून घ्या. त्यानंतर दात पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास लाल झालेले दात स्वच्छ होतील.
लिंबाच्या सालीमध्ये असलेले घटक दात स्वच्छ करतात. यासाठी लिंबाची साल घेऊन दातांवर घासा. त्यानंतर पाण्याने दात स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केल्यास दात स्वच्छ होतील आणि दातांवरील पिवळा थर कमी होईल.