शांत आणि आरामदायी झोपेसाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
राज्यभरात सगळीकडे कडक उन्हाळा वाढला आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या झळांमुळे सर्वच नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत घाम आल्यामुळे आणि शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी व्यवस्थित झोप देखील लागत नाही. सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, अस्वस्थता, घाम येणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे झोपमोड होऊ लागते. झोपमोड झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी शरीरात काम करण्याची इच्छा न होणे, सतत अशक्तपणा थकवा जाणवू लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शांत झोपेसाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे झोपमोड न होता चांगली आणि आरामदायी झोप लागेल.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. सतत घाम आल्यामुळे त्वचादेखील तेलकट आणि चिकट होऊन जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये झोप खराब होऊ नये म्हणून झोपण्याच्या खोलीत पंखा आणि एसीचा योग्य वापर करावा. याशिवाय झोपण्याआधी पांघरुण, उशा आणि गाद्या थंड करून घ्याव्यात, ज्यामुळे शांत झोप लागेल.
उन्हाळा सुरु झाल्यानंतर घामामुळे संपूर्ण शरीर तेलकट आणि चिकट होऊन जाते. शरीर तेलकट किंवा चिकट झाल्यानंतर योग्य वेळी अंघोळ न केल्यास घामाची दुर्गंधी शरीराला येते. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा सकाळच्या वेळी थंड पाण्याची अंघोळ करावी. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.
उन्हाळ्यात रात्री किंवा कोणत्याही वेळेत तेलकट तिखट पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य बिघडते आणि शरीराला हानी पोहचते. त्यामुळे उन्हाळ्यात सूप, दही, फळे किंवा ग्रीन सॅलड इत्यादी हलक्या पदार्थांचे सेवन करावे. पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीर सुद्धा निरोगी आणि आनंदी राहते.
सतत मोबाईल किंवा टीव्ही लॅपटॉप पाहत राहिल्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा बिघडून जाते. बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी शांत झोप घ्यावी. झोपल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. संपूर्ण शरीराला आरामाची आवश्यकता असते. आराम केल्यामुळे डोळ्यांनासुद्धा विश्रांती मिळते.