Make Tasty Green Chili Achar Without Oil Recipe In Marathi
Green Chili Achar Recipe : विना तेल घरी बनवा ‘हिरव्या मिरचीचं लोणचं’, चटकदार चव जेवणाची मजा करेल द्विगुणित
एकदा तेलाशिवाय हे मिरचीचं लोणचं करून पाहिलत, तर तुमच्या जिभेला याची चटक लागलीच असं समजा. जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणचं महत्त्वाची भूमिका बजावतं, आज आपण तेलाशिवाय मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं ते जाणून घेणार आहोत.
कैरी, लिंबू, मिरची अशा अनेक प्रकारचे लोणचे तयार केले जाते.
पण तेलाशिवाय लोणच्याचा विचार तुम्ही नक्कीच कधी केला नसावा.
फार जुन्या काळापासून जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणच्याचे सेवन केले जात आहे. लोणचं हा भारताचा पारंपारिक पदार्थ असून तो अनेक प्रकारे बनवला जातो. लोणचं बनवायचं म्हटलं की त्यात तेलाचा वापर हा आलाच. पण तुम्ही कधी विना तेलाचा वापर करता बनवलं जाणारं लोणचं खाल्लं आहे का? जेवणसोबत लोणच असेल तर जेवणाची मजा आणखी वाढते. विशेषतः मिरचीचा अचार पोळी, पुरी आणि पराठ्यासोबत खूपच चविष्ट लागतो. प्रवासात पुरी-लोणच्याचा सुगंध दूरपर्यंत पसरतो. तुम्हालाही लोणच खायला आवडत असेल, तर एकदा नक्की तेलाशिवाय मिरचीच लोणच लोणच करून पाहा. डाएट करणाऱ्यांसाठी हा लोणचं उत्तम पर्याय आहे, कारण यात तेल नसतानाही लोणच्याची खरी चव मिळते. तेलाविना मिरचीच लोणच बनवणे अतिशय सोप आणि झटपट प्रक्रिया आहे. चला तर मग याची रेसिपीजाणून घेऊया.
यासाठी सर्वप्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरड्या करा. मिरचीचा देठ काढून प्रत्येक मिरचीला मधोमध लांबट चिर द्या, पण मिरची तुटणार नाही याची काळजी घ्या.
एका कढईत बडीशेप, जिरे, मेथीदाणे आणि पिवळी मोहरी मंद आचेवर थोडेसे भाजून घ्या. मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून जाडसर पूड करून घ्या.
एका भांड्यात लिंबाचा रस घ्या. त्यात हळद, काश्मीरी लाल तिखट, तयार केलेला मसाल्याचा पूड, काळे जिरे, मीठ मिसळा. वेगळ्या वाटीत हिंग आणि काळं मीठ घ्या.
प्रत्येक मिरचीच्या आत थोडेसे हिंग आणि काळं मीठ लावा. नंतर सर्व मिरच्या लिंबाच्या मसाल्यात घालून नीट मिसळा.
तयार अचार स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.
हे लोणचं 24 तासांनंतर खाण्यास तयार होतो. तेल नसल्यामुळे हा अचार हलका लागतो आणि बाहेरही सहज साठवता येतो.
Web Title: Make tasty green chili achar without oil recipe in marathi