Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भाशयाच्या मुखाला ‘या’ कारणांमुळे येते सूज! शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढेल गंभीर आजारांचा धोका

गर्भाशयाच्या मुखाला सूज आल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे वेळीच ओळखून आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2026 | 05:30 AM
गर्भाशयाच्या मुखाला 'या' कारणांमुळे येते सूज! शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढेल गंभीर आजारांचा धोका

गर्भाशयाच्या मुखाला 'या' कारणांमुळे येते सूज! शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढेल गंभीर आजारांचा धोका

Follow Us
Follow Us:

गर्भाशयाच्या मुखाला सूज कशामुळे येते?
गर्भाशयाच्या मुखाला सूज आल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
नाजूक अवयवांची स्वच्छता राखणे का आवश्यक आहे?

कामाची धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मानसिक तणाव, आहारात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता, शरीरातील हार्मोन्सचे वाढते असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या बदलांकडे महिला लक्ष देत नाहीत. मात्र सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणारे हेच सामान्य बदल आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. मासिक पाळीत होणाऱ्या बदलांमुळे शरीरसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात. महिलांच्या शरीरातील नाजूक अवयवांमध्ये होणाऱ्या बदलांकडे सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने अतिशय गंभीर समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)

Heat Stroke: वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी

बऱ्याचदा अतिशय छोट्या वाटणाऱ्या समस्या मोठ्या आजारांचे कारण बनतात. डॉक्टरांच्या मते, महिलांमध्ये दिसून येणाऱ्या सामान्य समस्येचे निदान वेळीच होणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला गर्भाशयाच्या मुखाला कोणत्या कारणांमुळे सूज येते? सूज आल्यानंतर शरीरात कोणते गंभीर लक्षणे दिसून येतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे तुमच्या शरीरात सुद्धा ही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.

सर्विक्सला सूज कशामुळे येते?

सर्विक्स हा वजायनाला युटेरसशी जोडणारा महिलांच्या शरीरातील अतिशय महत्वाचा भाग आहे. या भागाला सूज आल्यानंतर शरीरात गंभीर लक्षणे दिसू लागतात. सूज आलेल्या भागाला सर्वाइकल इंफ्लेमेशन असे म्हणतात. याची लक्षणे काहीवेळा अतिशय सौम्य असतात. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये काहीच वाटत नाही. पण कालांतराने लक्षणे आणखीनच तीव्र होतात आणि आरोग्य बिघडून जाते. क्लॅमिडिया आणि गोनोरिया सारखे वजायनाचे संसर्गजन्य आजार झाल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाला सूज येण्याची जास्त शक्यता असते.

गर्भाशयाच्या मुखाला सूज आल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • वजायनातून जास्त प्रमाणात डिस्चार्ज होणे
  • दुर्गंधी येणे
  • लैंगिक संबंधांदरम्यान वेदना होणे
  • पेल्विक भागात सतत दुखणे
  • लघवी करताना जळजळ होणे
  • पीरियड्सच्या मध्ये रक्तस्राव होणे, यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
केसगळती होईल कायमची बंद! जेवणानंतर नियमित खा ‘या’ बियांपासून बनवलेला चमचाभर मुखवास, महिनाभरात होईल केसांची वाढ

वजायनामध्ये चांगले आणि वाईट बॅक्टेरियांचे संतुलन असते. मात्र हे संतुलन बिघडल्यानंतर बॅक्टेरियल वेजिनोसिस होतो. ज्याच्या परिणामामुळे गर्भाशयाच्या मुखाला सूज येते. तसेच योग्य वेळी उपचार न झाल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. कॉन्ट्रासेप्टिव्ह, स्पर्मिसाइड्स, डूशिंग किंवा सुगंधी इंटिमेट प्रोडक्ट्स वापरल्यामुळे सुद्धा नाजूक अवयवांचे आरोग्य बिघडून जाते. याशिवाय काहीवेळा महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे नाजूक अवयवांचे आजार होण्याची जास्त शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: The cervix swells due to these reasons ignoring the symptoms in the body will increase the risk of serious diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • health issue
  • menstruation health
  • women health

संबंधित बातम्या

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर
1

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…
2

Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
4

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.