फुफ्फुसांमधील घाण मुळांपासून होईल नष्ट! 'हा' घरगुती उपाय करून मिळवा आराम
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार होण्याची शक्यता असते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे सतत सर्दी, खोकला किंवा इतर साथीचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. बऱ्याचदा शरीरात उद्भवणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण दुर्लक्ष न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा ऑफिस, कॉलेज किंवा गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर खोकताना लाजिरवण्यासारख्या वाटू लागते. अनेक लोक सर्दी, खोकला झाल्यानंतर मेडिकलमधून गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते. सर्दी, खोकला झाल्यानंतर छातीमध्ये कफ जमा होऊ लागतो. छातीमध्ये जमा झालेला कफ आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.(फोटो सौजन्य – istock)
चुकीचा आहार, थंड पदार्थांचे अतिसेवन, मानसिक तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे विशेषता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही छातीत जमा झालेला कफ नष्ट करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे फुफ्फुसांमध्ये साचलेली घाण नष्ट होईल.
सर्दी खोकला झाल्यानंतर बरेच लोक दुर्लक्ष करतात. पण वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे शरीरसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. लवंग, वेलदोडा, आले आणि मध या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात साचलेला कफ नष्ट होण्यास मदत होते. याशिवाय आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले पदार्थ शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात.
आयुर्वेदिक चाटण तयार करण्यासाठी सर्वप्रथम, तव्यावर लवंग आणि वेलदोडे अतिशय काळे होईपर्यंत भाजून घ्या. थंड झाल्यानंतर खलबत्यामध्ये बारीक कुटून घ्या. तयार केलेल्या चूर्णामध्ये आल्याचा रस आणि मध घालून चाटण तयार करा. हे चाटण दिवसभरात दोन किंवा तीन वेळा घेतल्यास छातीमध्ये जमा झालेला कफ नष्ट होईल. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. घशात वाढलेली खवखव किंवा कफ नष्ट करण्यासाठी हे चाटण अतिशय प्रभावी ठरेल. सर्दी किंवा खोकल्याची लक्षणे शरीरात जाणवू लागल्यास आयुर्वेदिक पदार्थांपासून बनवलेल्या चूर्णाचे सेवन करावे.
खोकल्यासाठी काही घरगुती उपाय?
मध त्याच्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते, जे घसा खवखवणे शांत करण्यास आणि श्लेष्मा सोडण्यास मदत करू शकते.
खोकल्यासाठी डॉक्टरांना कधी भेटावे?
जर तुमचा खोकला ८ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते. जर तुमच्या खोकल्यासोबत ताप, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा खोकताना रक्त येत असेल तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.
खोकल्याची काही सामान्य कारणे कोणती आहेत?
सर्दी आणि फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गांमुळे बहुतेकदा कोरडा आणि ओला खोकला होतो. धूर, धूळ किंवा इतर त्रासदायक घटकांच्या संपर्कात आल्याने खोकला होऊ शकतो. ऍलर्जीक प्रतिक्रियांमुळे श्वसनमार्गात जळजळ होऊ शकते, ज्यामुळे खोकला येतो.