फोटो सौजन्य - Social Media
कोकण म्हणजे अनुभव! तो अनुभव भयाणही असू शकतो. रात्रीच्या प्रवासात कोकण फक्त शांतता आणि भयानक अनुभव देतो. अशाच काही प्रसंग मुंबईतील काही ग्रुपच्या नशिबी आला. मुंबईत रोजच्या ताणतणावाच्या आयुष्यातून काही काळ मोकळे होण्यासाठी कोकणाच्या दिशेने निघालेला हा ग्रुप एका अशा जाळ्यात फसतो, ज्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त नशिब जबाबदार असतो. पण या ग्रुपकडे नशीब होता त्यामुळे या जाळ्यातून ते बाहेर पडू शकले. तरी एक अद्भुत अनुभव त्यांच्या मनात आजही रुजून आहे, चला तर मग जाणून घेऊयात तो अनुभव:
धीरज त्याच्या सवंगड्यांसह मुंबईतून कोकणच्या दिशेने निघाला. धीरजचे गाव तसे फार आत नाही. मुंबईपासून अगदी तीन तासांच्या अंतरावर असणाऱ्या म्हसळा तालुक्यात त्याचे गाव आहे. पण रात्रीचा काळ होता. लोणेरे येताच त्यांनी मुंबई गोवा हायवे सोडला. रात्रीच्या काळभोर काळोखात त्यांची गाडी रानावनात सुसाट जात होती. अशामध्ये धीरजच्या एका सवंगड्याने बाहेर पहिले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की तिथे एक वडाचे झाड, जे पुन्हा पुन्हा आपल्याला दिसत आहे. काही क्षणानंतर त्याला जाणवले की तेच झाड नव्हे तर तेथील संपूर्ण परिसर पुन्हा पुन्हा आपल्याला दिसत आहे. चालक सुधीर आधीच डुलक्या टाकून गाडी चालवत होता. त्यालाही ही गोष्ट जाणवताच त्याने धीरज तसेच इतर सवंगड्यांना ती बाब सांगितली. तो म्हणालो, “वाटतं, आपल्याला चकवा लागलाय…” हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजतात.
ज्या सवंगड्याने ही बाब आधी लक्षात घेतली, तो ही ओरडून सगळ्यांना सांगतो की ‘ते पहा समोर, वडाचे झाड येत आहे. हे झाड मी गेल्या १५ मिनिटांपासून पाहत आहे. किमान ७ ते ८ वेळा, आपली गाडी या झाडाच्या शेजारून गेली आहे.” हे ऐकून गाडीत बसणाऱ्या सगळ्यांच्या कपाळाला घाम सुटायला सुरु होतो. धीरज म्हणतो, “अरे हो… लोणेरे सोडले की माझे गाव अगदी १० ते १५ मिनिटांवर आहे. पण जवळजवळ २० मिनिटांहून जास्त वेळ झाला. ही गोष्ट मी लक्षात घेतलीच नाही.” गाडीत भयाण शांतता पसरते. सगळ्यांना माहिती असतं की आपण चकव्याच्या जाळ्यात अडकलो आहोत.
अशामध्ये धीराजला कुसलेला वास येत असतो. हा वास गाडीमधूनच येत असतो. तेव्हा त्याला आठवते की त्यांनी येताना रस्त्यात चिकन कलेजी घेतलेली असते. तसेच त्यांनी लहानपणी आजीकडून असेही ऐकलेले असते की “वाईट शक्ती मासांकडे आकर्षित होते.” तेव्हा तो मागे बसणाऱ्या सवंगड्याला ओरडून सांगतो की “तुझ्या हातात असलेली कलेजी लवकर बाहेर फेक.” आधी मागे बसलेला सवंगडी “धीरज काय मूर्खपणा लावला आहेस?” म्हणत प्रश्न करतो. तेव्हा कसलाही वेळ न दवडता, धीरज स्वतः उठून त्याच्या हातातील कलेजी खेचून घेतो आणि खिडकीतून बाहेर फेकतो. सगळीजणं धीराजकडे पाहत बसतात. धीरज चालकाला सांगतो की काहीही करून गाडी थांबवू नकोस.
पाहता पाहता ते वडाचे झाड पुन्हा पुन्हा दिसणे बंद होते आणि त्यांची कायमची चकव्यातून सुटका होते. असे म्हणतात की “मासाकडे वाईट शक्ती आकर्षित होते.” हे सत्य आहे की खोटं? याविषयी आम्हाला काहीच ठाऊक नाही, परंतु, असे अनेक अनुभव तुमच्या कानी नक्कीच आले असतील.
टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही