Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sahyadri Tiger Reserve: आंबोलीच्या देवराईत वाघाचे दर्शन! ७-८ फुटांवर वाघ…; रोमांचकारी अनुभव कॅमेऱ्यात कैद

सध्या सिंधुदुर्गात व्याघ्र गणना सुरू आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीसह वाघाचे दोन बछडेही कैद झाले आहेत. त्यामुळे सह्याद्रीतील जंगलभाग वाघांच्या प्रजननासाठी नैसर्गिक केंद्र असल्याचे सिद्ध झाले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 20, 2026 | 05:21 PM
Sahyadri Tiger Reserve: आंबोलीच्या देवराईत वाघाचे दर्शन! ७-८ फुटांवर वाघ…; रोमांचकारी अनुभव कॅमेऱ्यात कैद
Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रामस्थ आनंद गावडे आणि सहकाऱ्यांना अगदी ७-८ फुटांवर दर्शन झाले. १.५ मिनिटे वाघ त्यांच्या समोर होता.
  • तेरवण येथील ग्रामस्थ आणि एका पत्रकाराला हा दुर्मिळ काळा बिबट्या दिसला.
  • सध्या सुरू असलेल्या व्याघ्र गणनेदरम्यान ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीसह दोन बछडे कैद झाले आहेत.
 

Sahyadri Tiger Reserve: सिंधुदुर्गातील पश्चिम घाट वाघ, ब्लॅक पँथर, किंग कोब्रा अशा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग (वाइल्डलाईफ कॉरिडॉर) आहे. याच भ्रमणमार्गात महाशिवरात्रीला एकाच दिवशी वाघ आणि ब्लॅक पँथरचे दर्शन अनेकांना घडले.

महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात जाताना आनंद गावडे यांना आंबोलीत वाघाचे दर्शन झाले. तर तेरवण – मेढे रस्त्यावर तेरवण येथील ग्रामस्थ आणि एका पत्रकाराला ब्लॅक पँथर दिसला. गेळे – आंबोली येथील मलय नावाने परिचित असलेल्या भागात लिंगाची राई आहे. या देवराईत असलेल्या महादेवाच्या प्राचीन स्थळाकडे जाताना स्थानिक ग्रामस्थ आनंद गावडे, नारायण लाड, अनिल सुतार, संदीप सुतार व आनंदची मावशी यांना कच्च्या रस्त्यालगतच्या झाडीत वाघ दिसला. त्यांच्यासमोर अगदी सात – आठ फुटांवर तो वाघ होता, प्रत्यक्ष वाघ बघून ते स्तिमित झाले. एक दीड मिनिटांनी सावरल्यावर त्यांनी त्याचे फोटोही काढले. अर्थात सर्वांसाठी हा अनुभव भीतीदायक व रोमांचकारीही होता.

Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड

ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीसह दोन बछडेही कैद

सध्या सिंधुदुर्गात व्याघ्र गणना सुरू आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीसह वाघाचे दोन बछडेही कैद झाले आहेत. त्यामुळे सह्याद्रीतील जंगलभाग वाघांच्या प्रजननासाठी नैसर्गिक केंद्र असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यातच रविवारी पुन्हा एकदा वाघाचे दर्शन झाले आणि वाघाचा अधिवास ठळक झाला. वन विभागाला आंबोलीत पिल्ले मोठी झाल्याने एकटी फिरणारी वाघीण दिसली होती, तीच ही वाघीण आहे की, दुसरा वाघ किंवा वाघीण आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही.

तेरवण – मेढे रस्त्यावर ब्लॅक पँथर

महाशिवरात्रीला दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील नागनाथ मंदिराकडून तेरवणला जाणाऱ्या रस्त्यावर काही ग्रामस्थ आणि एका पत्रकाराला सायंकाळी सहाच्या दरम्यान एक ब्लॅक पँथर दिसला. महाशिवरात्री उत्सवासाठी दोन्ही ठिकाणाहून शिवभक्तांची ये-जा सुरू असते. हा नवीन रस्ता पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) भाग असलेल्या पूर्ण जंगलातून जातो. या भागात गवे,हत्ती व अन्य वन्यप्राणी आढळतात. अधूनमधून बिबट्या, ब्लॅक पँथरचेही दर्शन घडायचे. रविवारी मात्र,पुन्हा एकदा ब्लॅक पँथरचे दर्शन अनेकांना झाले.

पोलिस होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार! ‘या’ जिल्ह्यात होणार भरती; 87 पदांसाठी हजारो अर्ज दाखल

देवराया वाचवायला हव्यात

आंबोली परिसरात दिसलेला वाघ देवराईतील घनगर्द जंगलात आढळला. जंगले नष्ट झाल्याने बिबटे, वाघ, गवे, ब्लॅक पँथर, किंग कोब्रा मानवी वस्तीत येत आहेत. पूर्वी देवराई जपल्या जायच्या, आता त्या एकामागोमाग एक तोडल्या जात आहेत. त्या जपायला हव्यात;अन्यथा वस्तीत येण्याशिवाय वन्य प्राण्यांना दुसरा पर्यायच उरणार नाही.

वाइल्डलाईफ कॉरिडॉर जपण्याची गरज

गोवा आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणारा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर एकच आहे.पर्यावरण साखळीतील अत्यंत महत्वाचे घटक असलेले वन्यजीव वाचवायचे असतील, तर सह्याद्रीतील गोवा ते आंबोली हा वाइल्डलाईफ कॉरिडॉर जपण्याची गरज आहे.त्यासाठी दोन्ही राज्यांनी संयुक्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

नारायण गडाच्या वेशीवर जंगलात पूर्वी आमचे पूर्वज राहायचे. या देवराईत वाघ असतो,असे जुनी माणसे सांगायची. पण,रविवारी प्रत्यक्ष वाघ बघितला आणि धन्य झालो. अजूनही तो क्षण आणि रुबाबदार वाघ नजरेसमोरून जात नाही.
– आनंद गावडे, शिक्षक, लोणावळा.

 

Web Title: Tiger sighted in ambolis devrai villagers are amazed to see a tiger at 7 8 feet thrilling experience captured on camera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Kokan News
  • Sindhudurg News
  • Tiger Project

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.